काल राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन चहापाणी करत होते.तसेच राज ठाकरे यांनी मनसेच्या उपविभागीय अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या घरी जेवण केले.Photo of Raj’s dinner goes viral everywhere; What exactly is the case
विशेष प्रतिनिधी
पुणे : आगामी काळात राज्यात महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत.राज्यातील एक महत्त्वाची महापालिका म्हणून पुणे महापालिकेला ओळखण्यात येतं.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना यावेळी पुण्यामध्ये पक्षाच्या चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.पुणे येथील आपल्या पक्षाच्या आढावा बैठकीसाठी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते.
यावेळी राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यातील एका फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.काल राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन चहापाणी करत होते.तसेच राज ठाकरे यांनी मनसेच्या उपविभागीय अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या घरी जेवण केले.यावेळी राज ठाकरे यांनी खुर्चीवर बसून जेवण केलं तर इतर नेत्यांनी खाली बसून जेवण केलं.
राज ठाकरे यांच्या जेवणाचा हाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच फोटोवरून राज ठाकरे यांना ट्रोल करण्यात येत आहे. पण मनसेच्या अधिकृत खात्यावरून हा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया झाली असून त्यांना त्रास जाणवत असल्यानं राज हे खुर्चीवर बसून जेवत आहेत, असं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App