मुंबईत पोलीस कंट्रोल रूममध्ये फोन; हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी

वृत्तसंस्था

मुंबई : मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये हाजी आली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती  समोर आल्याने मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. हा धमकीचा फोन मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये उल्हासनगरमधून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.Phone in police control room in Mumbai; Threat of terrorist attack on Hajiali Dargah

मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये धमकीचे फोन येण्याचे सत्र सुरूच आहे. पुन्हा एकदा धमकीचा फोन आला असून मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी या फोनवरून देण्यात आली आहे. हा धमकीचा फोन आल्यानंतर तात्काळ ताडदेव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या मुंबई पोलिसांसह बीडीडीएस, कॉन्वेंट वेनलाही पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी हाजी अली दर्ग्याच्या आजूबाजूचा परिसर आणि एल अॅण्ड टीच्या प्रोजेक्टची तपासणी केली मात्र या तपासणीअंती काहीत हाती लागले नाही.


Mumbai Metro : गुढी उभारण्याच्या दिवशी ठाकरे – पवारांची आपापली राजकीय पायाभरणी!!


फोनवरून धमकी देणाऱ्या व्यक्तीने हाजीअली येथे १७ दहशतवादी येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला दिली. ज्या नंबरवरून फोन आला होता त्या नंबरवर पुन्हा फोन केल्यावर तो फोन बंद असल्याचे आढळले, अशी माहिती पोलिसांनी दिली. संबंधित फोन उल्हासनगरहून आल्याचे पोलीस तपासात उघड झाले. धमकीचा फोन करणारी व्यक्ती मानसिक रूग्ण असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. हा फोन गुरूवारी दुपारी 2.00 वाजण्याच्या सुमारास आल्याचे सांगितले जात आहे.

Phone in police control room in Mumbai; Threat of terrorist attack on Hajiali Dargah

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात