गोव्यासह सीमावर्ती भागात पेट्रोल २५ रुपयांनी स्वस्त; सीमेवरील नागरिकांची भरण्यासाठी धाव


वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्रापेक्षा गोव्यात पेट्रोल २५ रुपयांनी स्वस्त मिळत आहे. त्यामुळे सीमा भागातील नागरिकांनी चक्क गोव्यात पेट्रोल भरण्यासाठी धाव घेतली आहे. Petrol at Rs 25 in border areas including Goa Cheap; Run to fill the citizens at the border

कर्नाटक, गोवा, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. तेथील सरकारनी केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार इंधनावरील कर कमी केले आहेत. मात्र महाराष्ट्रातील ठाकरे- पवार सरकार इंधनावरचे कर कमी करत नाही. त्यामुळे जनतेला महाग दरात पेट्रोल आणि डिझेल खरेदी करावे लागत आहे.महाराष्ट्राच्या तुलनेत या शेजारी राज्यांमध्ये पेट्रोल व डिझेल बर्‍याच स्वस्तात उपलब्ध होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील खासगी आणि मालवाहतूक करणारी वाहने सीमेबाहेर जाऊन पेट्रोल व डिझेल भरणा करत आहेत. अशीच परिस्थिती गोव्यात आहे.
विशेष म्हणजे सीमेजवळच्या पेट्रोल पंपांवरील इंधनाची विक्री ५० टक्क्यांनी वाढली आहे.

Petrol at Rs 25 in border areas including Goa Cheap; Run to fill the citizens at the border

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात