विशेष प्रतिनिधी
मुंबई : जनतेने नाकारलेल्या घराणेशाहीवरून एकमेकांची खेचाखेची राज ठाकरे आणि अजित पवारांच्या पक्षांच्या नेत्यांची रंगली जुगलबंदी!!
त्याचे झाले असे :
विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी मनसेच्या घेतलेल्या मेळाव्यात महायुतीला पडलेल्या मतांबद्दल आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) आणि निवडणूक प्रक्रिया यावर शंका उपस्थित केल्या. त्यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी लोकसभेत फक्त 1 खासदार निवडून आणता आलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 आमदार निवडून आणता येतातच कसे??, असा असा सवाल केला. त्यावरून अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते चिडले. त्यांनी राज ठाकरे आणि मनसेवर टीकास्त्र सोडले. राज ठाकरे यांच्या मुलाला देखील त्यांना निवडून आणता आले नाही, असा टोला अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि खुद्द अजितदादांनी राज ठाकरे यांना हाणला.
त्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीला प्रत्युत्तर दिले. अजित पवारांना देखील स्वतःच्या मुलाला आणि पत्नीला निवडून आणता आले नव्हते. भाजपचा पदर धरला म्हणून त्यांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार निवडून आले. अमित ठाकरेंना जी मते मिळाली, ती राज ठाकरेंच्या बळावर मिळाली, पण अजितदादांना भाजपच्या बळावर मते मिळाली, स्वबळावर नाही, असा टोला संदीप देशपांडे यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीला हाणला.
प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या जनतेने अजितदादांची आणि राज ठाकरे या दोघांचीही घराणेशाही नाकारली. अजितदादांचा मुलगा पार्थ पवार 2019 च्या निवडणुकीत मावळ मधल्या मतदारांनी पाडला. बारामती मधून मतदारांनी सुनेत्रा पवारांना नाकारले, तर मुंबईतल्या माहीमच्या मतदारांनी अमित ठाकरे यांना नाकारले. याचा अर्थ ठाकरे आणि पवारांची घराणेशाही मतदारांनी नाकारली, पण या दोन्ही नेत्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी त्यावरून एकमेकांची खेचली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App