प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेणार याची पुण्यात जोरदार चर्चा होती. त्यानुसार पवार प्रत्यक्ष दगडूशेठ मंदिरापाशी आले… पण त्यांनी मांसाहार केलेला असल्यामुळे मंदिराच्या बाहेरून दर्शन घेतले!! मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला आणि त्यांनी नंतर मंदिराच्या विस्तारासाठी मंदिराच्या मागच्या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील होते. Pawar’s Dagdusheth Ganpati Darshan from outside; The reason is meat eating
पवारांचा दगडूशेठ मंदिराचा हा दौरा प्रसारमाध्यमांनी “पवारांचे हिंदुत्व” या नावाने गाजवला. पवार प्रत्यक्षात दगडूशेठ मंदिरापाशी आले. त्यांनी बाहेरूनच दर्शन घेतले. त्यामुळे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना आश्चर्य वाटले. पवार मंदिरात जातील याची ते प्रतीक्षा करत होते. परंतु पवार मंदिरात गेले नाहीत. याचा खुलासा नंतर माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केला. पवार साहेबांना आपण मंदिरात चलावे, असे पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सांगताच पवारांनी आम्हाला आपण मांसाहार केला असल्याने मंदिरात येत नाही. बाहेरून दर्शन घेतो, असे सांगितले. पवारांनी हा चुकीचा पायंडा पाडला नाही. याबद्दल प्रशांत जगताप यांनी सार्थ अभिमान व्यक्त केला. यावरून राजकीय क्षेत्रात जोरदार प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत.
– मंदिराच्या विस्तारासाठी जागेची पाहणी
पण पवारांच्या दगडूशेठ गणपती मंदिर जवळ याचा नंतर वेगळा खुलासा झाला. दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्टने मंदिराच्या विस्तारासाठी मंदिराच्या मागची जागा मागितली आहे. ही जागा पुण्यातील प्रसिद्ध फरासखाना पोलीस स्टेशनच्या आवारात येते. ही जागा गृहमंत्रालयाच्या ताब्यात आहे. त्यामुळे मंदिराच्या विस्तारासाठी नेमकी कोणती जागा हवी आहे, याची पाहणी शरद पवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांच्याबरोबर जाऊन केली. दगडूशेठ मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी देखील यावेळी त्यांच्या समवेत होते.
– मंदिराच्या विस्तारासाठी फरासखान्याची जागा
दगडूशेठ गणपती मंदिर परिसरातील जागा प्रचंड गजबजलेली आहे. 1980 च्या दशकापर्यंत तेथे पुणे महापालिकेच्या जागेत आगीचा बंब उभा होता. एक खादी भांडार होते. ते पाडून नंतर दगडूशेठ गणपती मंदिर बांधले. सार्वजनिक नगर वाचन मंदिरासमोर गणपती भवन बांधले. हा विस्तार 1990 च्या दशकानंतरचा आहे. आता 2022 मध्ये दगडूशेठ गणपती मंदिराचा आणखी विस्तार करायचा मंदिर ट्रस्ट समितीचा विचार आहे. यासाठी समितीला मंदिराच्या मागे असलेली जागा हवी आहे. ही जागा फरासखाना पोलिस स्टेशनच्या परिसरात येते. अर्थातच ही जागा महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाच्या ताब्यात आहे. त्यामुळे पवारांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या समवेत जाऊन या जागेची पाहणी केली आहे.
-“पवारांचे सोशल इंगिनीरिंग; भिडे वाड्याची पाहणी
पवारांनी दगडूशेठ मंदिर परिसरात येण्याआधी भिडे वाड्याचीही पाहणी केली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली. त्या भिडे वाड्याची रिडेव्हलपमेंट करण्याची योजना आहे. तेथील नागरिकांना पर्यायी जागा देऊन त्यांचे पुनर्वसन करायचे घाटत आहे. नंतर तिथे फक्त मुलींची शाळा सुरू करण्याची योजना आहे. या वाड्याची पाहणी शरद पवार यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App