पवारांचे सुप्रिया ब्रँडिंग : प्रफुल्ल पटेल, अजितदादांसाठी सुप्रिया सुळेंवर अन्याय केल्याचा पवारांचा दावा

विशेष प्रतिनिधी

नाशिक : राष्ट्रवादीत शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ अशा घामासानात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला मूळ मुद्दा “सुप्रिया ब्रॅण्डिंग” सोडलेला नाही.Pawar’s claim of injustice to Supriya Sule for Praful Patel, Ajitdada

प्रफुल्ल पटेल यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीच्या मुलाखतीतल्या आरोपावर उत्तर देण्याच्या निमित्ताने शरद पवार यांनी मुंबई आणि नाशिक मध्ये सुप्रिया ब्रॅण्डिंग करून घेतले. सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवारांनी अजितदादांवर अन्याय केल्याचा आरोप प्रफुल्ल पटेल यांनी लोकसत्ताच्या मुलाखतीत केला होता.



या संदर्भात मुंबईत मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत आणि नाशिक मधल्या पत्रकार परिषदेत पवारांनी सविस्तर उत्तर दिले. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी सुप्रिया सुप्रियावर अन्याय केला. पण या दोघांना पदे दिली, असे शरद पवार म्हणाले.

त्यावेळी शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांचे सुरुवातीपासूनचे राजकीय प्रोफाइल वाचले. सुरुवातीला सुप्रिया सुळे लक्ष्मण माने यांच्याबरोबर भटक्या विमुक्तांसाठी काम करत होत्या. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आग्रह केला म्हणून त्या राजकीय क्षेत्रात आल्या. त्या राज्यसभेच्या सदस्य बनल्या. ज्यावेळी केंद्रीय मंत्री पदाची संधी आली, त्यावेळी सूर्यकांता पाटील, अगाथा संगमा यांना राष्ट्रवादी काँग्रेसने संधी दिली, पण सुप्रिया सुळेंना संधी दिली नाही. प्रफुल्ल पटेलांचा तर लोकसभा निवडणुकीत पराभव होऊन देखील 2009 मध्ये त्यांना केंद्रीय मंत्री केले. अजित पवारांना चार वेळा उपमुख्यमंत्री केले, त्याची आठवण पवारांनी करून दिली आणि सुप्रिया सुळे यांना कधीही मंत्री केले नाही. कोणते पद दिले नाही असा दावा केला.

अजितदादांच्या मूळ मुद्द्याला बगल

मात्र या सगळ्यात सुप्रिया सुळे यांचे ब्रँडिंग करताना अजित पवारांचा मूळ मुद्दा आजही पवारांनी दुर्लक्षितच ठेवला. 2004 मध्ये काँग्रेस पेक्षा जास्त म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे 71 आमदार निवडून आलेले असताना मुख्यमंत्रीपद स्वतःहून काँग्रेसला का दिले?? आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपद सोपवताना महाराष्ट्राची सूत्रेही फक्त त्यांच्याचकडे का?? हे मुद्दे अजितदादांनी उपस्थित केले होते. पण सुप्रिया ब्रॅण्डिंग करताना शरद पवारांनी या मूळ मुद्द्यांना हातच घातला नाही. मुंबई तकच्या मुलाखतीत पत्रकार साहिल जोशीने त्यांना हा प्रश्नच विचारला नाही, तसेच नाशिकच्या पत्रकार परिषदेतही पत्रकारांनी पवारांना हा प्रश्न विचारला नाही. त्यामुळे त्यांना त्याचे उत्तर द्यावे लागले नाही.

Pawar’s claim of injustice to Supriya Sule for Praful Patel, Ajitdada

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात