प्रतिनिधी
पुणे : गेल्या काही महिन्यांपासून शरद पवारांच्या रिटायरमेंट विषयी उलट सुलट बातम्या येत आहेत. आत्मचरित्राच्या विस्तारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळ्यात त्यांनी स्वतःच निवृत्तीची घोषणा केली होती, पण ती नंतर त्यांना मागे घ्यावी लागली. त्यानंतर बऱ्याच घडामोडी झाल्या आणि राष्ट्रवादी फुटली किंवा फुटली नाही. या पार्श्वभूमीवर पवारांचे जिवलग मित्र सायरस पुनावाला यांनी पवारांना आता वय झालंय, रिटायर व्हा!!, असा स्पष्ट सल्ला दिला आहे.Pawar missed PM opportunity twice, but now he is old, he should retire!!; Advice from best friend Cyrus Poonawalla
काही दिवसांपूर्वीच अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शरद पवारांच्या भूमिकेशी फारकत घेत सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर झालेल्या पहिल्याच सभेत अजित पवारांनी थेट शरद पवारांच्या वयावरून थेट भाष्य केले होते. पवारांचे वय झाल्याने त्यांनी कुठेतरी थांबायला हवे, असा टोला अजितदादांनी हाणला होता त्यावरून पवारांनी अजितदादांवर टीका केली. पण आता खुद्द पवारांचे जिवलग मित्र, सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक सायरस पूनावाला यांनीच त्यांना रिटायर होण्याचा सल्ला दिला आहे.
सायरस पूनावाला आज पुण्यात एक कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना शरद पवारांविषयी विचारले. तेव्हा पूनावाला यांनी शरद पवारांचे कौतुक करत एक खंतही बोलून दाखवली. ते म्हणाले की, शरद पवार यांना दोन वेळा पंतप्रधान बनण्याची संधी होती, मात्र त्यांनी ती घालवली. ते फार हुशार व्यक्ती असून ते जनतेची चांगली सेवा करू शकले असते. मात्र आता त्यांचे वय झाले आहे. त्यामुळे त्यांनी आता रिटायर व्हावे!!
सायरस पुनावाला यांचा शरद पवारांना निवृत्तीचा सल्ला #CyrusPoonawalla #SharadPawar #MaharashtraPolitics pic.twitter.com/2sjSqooNMj — LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 30, 2023
सायरस पुनावाला यांचा शरद पवारांना निवृत्तीचा सल्ला #CyrusPoonawalla #SharadPawar #MaharashtraPolitics pic.twitter.com/2sjSqooNMj
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 30, 2023
अजित पवारांनी त्यांना रिटायरमेंट घेण्याचा सल्ला दिल्यानंतर शरद पवारांनी मी आणखी जोमाने काम करेन, मी थांबण्याचा प्रश्नच येत नाहीत. उगाच वया-बियाच्या भानगडीत पडू नका, वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल, असा इशारा त्यांनी अजित पवार गटाला दिला होता.
पण आता जिवलग मित्र सायरस पूनावाला यांनी देखील शरद पवारांना राजकारणातून निवृत्त होण्याचा सल्ला दिलाा आहे. त्यामुळे शरद पवार आपल्या जिवलग मित्राच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया देतात??, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App