
प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्र दिल्ली समोर कधी झुकणार नाही हा इतिहास आहे. ही प्रेरणा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून मिळाली आहे. हे तालकटोरा स्टेडियम जेथे उभे आहे, त्याच भूमीतून थोरल्या बाजीराव पेशव्यांनी दिल्लीतल्या मुघल सल्तनतीला आव्हान दिले होते, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काढले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठव्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात ते दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे बोलत होते. Pawar gave the example of Chhatrapati Shivaji Maharaj, Bajirao Peshwa sharad pawar
आपल्या भाषणात शरद पवारांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर जोरदार शरसंधान साधले. केंद्र सरकारने संसदेचे चर्चेचे अधिकार नाकारून कृषी कायदे संमत करून घेतले. त्यावर चर्चा देखील घडू दिली नाही. पण जेव्हा देशातले शेतकरी दिल्लीच्या सीमेवर येऊन बसले तेव्हा त्यांच्याकडे वर्षभर लक्ष द्यायला देखील सरकारला वेळ मिळाला नाही. शेतकऱ्यांचा दबाव यशस्वी झाल्यानंतर केंद्र सरकारला त्यांच्या दबावा पुढे झुकावे लागून कृषी कायदे मागे घ्यावे लागले, असे टीकास्त्र पवारांनी सोडले.
त्याचवेळी त्यांनी गुजरातमधल्या बिल्कीस बानू प्रकरणाचा देखील उल्लेख केला. एकीकडे पंतप्रधान लाल किल्ल्याच्या भाषणावरून महिला सन्मानाचे भाषण करतात तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाची सत्ता असलेल्या गुजरातमध्ये बिल्किस बानू या महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना तुरुंगातून सोडून दिले जाते. या जातीयवादी सरकारपासून देशाला मुक्ती मिळाली पाहिजे, असे पवार म्हणाले.
केंद्रातल्या मोदी सरकारला आव्हान देताना पवारांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि थोरले बाजीराव पेशवे यांची उदाहरणे दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यामध्ये मुघल बादशहा समोर झुकायला नकार दिला होता, तर ज्या तालकटोरा स्टेडियम मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन चालू आहे त्याच भूमीवरून थोरल्या बाजीराव पेशव्यांनी मुघल सल्तनतीला आव्हान दिले होते, याची आठवण पवारांनी करून दिली. त्याचवेळी पवारांनी सदाशिवराव भाऊ पेशव्यांचा देखील आपल्या भाषणात उल्लेख केला. सदाशिव भाऊ पेशव्यांना दिल्ली जिंकण्याची संधी आली होती. परंतु त्यांना कुणीतरी गंगास्नान करण्याचा सल्ला दिला आणि ते दिल्ली जिंकण्याऐवजी गंगास्नानाला जाऊन त्यातून पानिपतावर गेले. तेथे मराठ्यांना पराभव पत्करावा लागला, असा उल्लेख पवारांनी आपल्या भाषणात केला.
Pawar gave the example of Chhatrapati Shivaji Maharaj, Bajirao Peshwa sharad pawar
महत्वाच्या बातम्या
- राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाबद्दल भारतात आज एक दिवसाचा राजकीय शोक, अर्ध्यावरती येणार तिरंगा
- अदार पूनावालाच्या नावाने सीरम इन्स्टिट्यूटची फसवणूक, 1 कोटी रुपयांचा गंडा
- नोकरीची संधी : SBI बॅंकेत 5000 पदांसाठी मेगाभरती; असा करा अर्ज!!
- महाराष्ट्र सरकारला १२ हजार कोटींचा दंड, राष्ट्रीय हरित लवादाचा मोठा निर्णय