वृत्तसंस्था
मुंबई : कोरोना लसीकरण पूर्ण झालेल्या म्हणजे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना महाराष्ट्रात येताना आरटीपीसीआर चाचणीची गरज नाही, असे आदेश राज्य सरकारच्या महसूल, वन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने एका परिपत्रकाद्वारे काढले आहेत. Passengers who have taken two Dose’s Coronavirus vaccine than they can enter in Maharashtra without RTPCR test
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना आणि दुसरा डोस घेऊन १५ दिवस पूर्ण झाले आहे. त्याचे सर्टिफिकेट प्रलंबित आहे, अशा व्यक्तींना महाराष्ट्रात येताना आता आरटीपीसीआर चाचणी करण्याची गरज नाही, असे परिपत्रकात म्हंटले आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्य सरकारने प्रवसासंदर्भातील नियमांमध्ये बदल केल्याचे हे यावरून स्पष्ट होत आहे. महाराष्ट्र आणि परराज्यातील लोकांना हा चाचणीचा नियम एकसारखा लागू राहणार आहे, दुसरीकडे ज्यांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले नाहीत. त्यांना ४८ तासांपूर्वीचा आरटीपीसीचार चाचणीचा अहवाल सादर करावा लागणार आहे. यापूर्वी कालावधी हा ७२ तसंच होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more