विशेष प्रतिनिधी
नगर: कोरोना काळात केलेल्या कामामुळे पारनेरचे आमदार हिरो बनले; मात्र महसूल प्रशासनातं त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे. राजकीय दबाव असय झाल्याने येथील महिला तहसीलदारांनी आत्महत्येचा इशारा दिला आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांची लोकप्रतिनिधींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा देणारी आडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. कोणाचेही नाव घेतलेले नसले तरी त्यांचा रोख हा पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे. Parner’s female tehsildar warns of suicide, Audio clip with indicating MLA Nilesh Lanka goes viral
अमरावती वनविभागात अधिकारी पदावर असलेल्या दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या जाचास कंटाळून आत्महत्या केल्याने महाराष्ट्र हादरला होता. महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याचाच संदर्भ देत ज्योती यांनी म्हटले आहे कि प्रिय दीपाली चव्हाण मीही तुझ्या वाटेवर येते तुला सोबत, कारण तुझ्या वाटेवरच दिसते आशेची उजळलेली पणती, अशी भावनीक साद घालत या आडिओ क्लीपमध्ये आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. सध्या ही आडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.
या आडिओ क्लीपमध्ये पुढे म्हटले आहे की, तत्वाला मुरड घालून जगता येत नाही, लोकप्रतिनिधींच्या तालावर चालता येत नाही, त्यांनी थुंकलेलं चाटता येत नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या धिंडी मला रोखता येत नाहीत, त्यांनी तर खिंडीत सहाय्य पोहचवण्याऐवजी मारेकरी पोहचविण्याचे काम केले. लोकप्रतिनिधी आणि आपण एक रथ आणि दोन चाकं, पण आपल्या चाकांनी जरा गती घेतली की, आपला घात निश्चित समजावा… अशी तब्बल सव्वा अकरा मिनीटाची ही आडिओ क्लीप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App