विशेष प्रतिनिधी
मुंबई – १९९१ – ९२ मध्ये शरद पवारांनी दिल्लीत नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री पदावर जाताना सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री केले होते. सुधाकरराव नाईक हे आपल्याच राजकीय कलाने वागतील असा पवारांचा होरा होता. पण तसे घडले नाही.Pappu kalani back in NCP fold, links among sharad pawar – pappu kalani and sudhakarrao naik
सुधाकरराव नाईकांनी मुख्यमंत्रीपदी राहुन आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना शह देण्यासाठी ठाणे जिल्ह्यतील गुन्हेगारांच्या विरोधात मोहीम उघडली होती. त्यातूनच पप्पू कलानी आणि हितेंद्र ठाकूर या आमदारांना त्यावेळच्या दहशतवाद प्रतिबंधक कायदा ‘टाडा’ या कायद्याखाली अटक केली होती. हा एक प्रकारे त्यावेळच्या काँग्रेसमधल्या शरद पवार गटाला धक्का होता.
त्यावेळी शरद पवारांनी पप्पू कलानीच्या बाबतीत कठोर कारवाई करू नका, अशा सूचना फोनवरून केल्याचे सुधाकरराव नाईक यांनी उघडपणे सांगितले तेव्हा महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला होता. पवार विरूध्द नाईक असा राजकीय संघर्ष उडाला होता.
१९९५ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यावेळचे विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार आणि पप्पू कलानी यांच्या विरोधात जोरदार मोहीमच उघडली होती. शरद पवारांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले आहे. पप्पू कलानी त्याचेच प्रतिक आहे,
असा जोरदार प्रचार त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी केला होता. १९९५ च्या निवडणुकीत शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पराभव झाला होता. त्याला एक प्रकारे महाराष्ट्रात पप्पू कलानी – शरद पवार यांची प्रतिमा कारणीभूत असल्याचे मानण्यात आले होते.
त्यानंतर राजकारणाच्या प्रवाहातून बरेच पाणी वाहून गेले. पप्पू कलानी २०१४ नंतर भाजपच्या प्रवाहात जाऊन “शुध्द” झाले. पण आता पुन्हा एकदा ते शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश करून स्वगृही आले आहेत. यातून पप्पू कलानी यांनी पवार ते पवार असे राजकीय वर्तुळ देखील पूर्ण केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App