भाजप – ठाकरे गटातून विस्तव जात नसताना धनुष्यबाण गमावलेल्या उद्धव ठाकरेंना पंकजा मुंडेंचा फोन!!; कोणत्या राजकारणाची नांदी??

प्रतिनिधी

मुंबई : भाजप आणि ठाकरे गट यांच्यातून विस्तव जात नसताना किंबहुना राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला असताना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली आहे. आपण उद्धव ठाकरेंची फोनवर बोललो आहोत, हे खरे पण काय बोललो आहोत, हे सांग माध्यमांना सांगणार नाही, असे पंकजा मुंडे यांनी नंतर स्पष्ट केले आहे. मात्र पंकजा मुंडे यांच्या या फोनमुळे ठाकरे आणि मुंडे या दोन राजकीय घराण्यांचे अस्वस्थ वारस एकमेकांशी नेमके काय बोलले असतील?? आणि ते भविष्यकाळात एकत्र येतील का??, याविषयी महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.Pankaja munde telephoned Uddhav Thackeray but didn’t disclose the details of discussions raised eyebrows in maharashtra



उद्धव ठाकरे यांनी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गमावल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर महाराष्ट्राचा एक नंबरचा शत्रू अशा शब्दात टीका केली आहे. त्या पुढे जाऊन संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अश्लील शब्दांमध्ये टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्रात चाटुगिरी सुरू आहे आणि ज्यांची चाटली जात आहे, ते आम्हाला न्याय देत आहेत, अशा शब्दांमध्ये राऊत यांनी शरसंधान साधले आहे. राऊतांच्या या अश्लीलिकेवरून नाशिक मध्ये त्यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे

या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आहे. ठाकरे आणि मुंडे या राजकीय घराण्यांच्या दोन अस्वस्थ वारसांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असावी??, याचा कयास महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात बांधला जात आहे. उद्धव ठाकरे प्रचंड अस्वस्थ तर आहेतच पण ते भाजपवर संतापलेले आहेत. पंकजा मुंडे नाराज आणि अस्वस्थ असल्याच्या बातम्या मराठी माध्यमे नियमिपणे देत आहेत. त्यामुळे हे दोन अस्वस्थ वारस भविष्यात एकत्र येणार का??, याविषयी देखील चर्चा सुरू झाली आहे.

Pankaja munde telephoned Uddhav Thackeray but didn’t disclose the details of discussions raised eyebrows in maharashtra

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात