नाशिक : पंकजा मुंडे यांनी सोडून दिली स्वतंत्र पक्षाची पुडी; महाराष्ट्रातल्या राजकीय असंतुष्टांनी घेतली त्यामध्ये उडी!! असे चित्र महाराष्ट्रात दिसले. Pankaja munde
त्याचे झाले असे :
नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी मध्ये स्वामी समर्थ केंद्रातल्या कृषी महोत्सवात पंकजा मुंडे पोचल्या. तिथे त्यांनी भाषण केले. त्यावेळी बोलताना पंकजा म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे यांच्यावर सगळ्या महाराष्ट्राने प्रेम केले. त्यांची मुलगी म्हणून माझ्यावरही प्रेम केले. महाराष्ट्र गुणांचा वारसा स्वीकारतो. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या व्यक्तींचा साठा केला, तर महाराष्ट्रात एक स्वतंत्र पक्ष उभा राहील. पण गोपीनाथ मुंडे यांनी कष्टातून भाजप महाराष्ट्रात उभा केला.
पंकजा मुंडे यांच्या तोंडून अशी स्वतंत्र पक्षाची भाषा सुरू झाल्याबरोबर राज्यात राजकीय चर्चेला उधाण आले. पंकजा मुंडेंचा गेल्या ५ वर्षातला राजकीय इतिहास पाहता त्याला हवा मिळाली. 2019 मध्ये पंकजा मुंडे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर खूप अस्वस्थ झाल्या होत्या. ही अस्वस्थता गेली ५ वर्षे टिकून होती. ती वेगवेगळ्या वक्तव्यांमधून महाराष्ट्रासमोर आली. पण 2024 मध्ये पंकजा मुंडे यांना भाजपने विधान परिषदेवर घेतले. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्रिमंडळात मंत्री केले. त्यामुळे त्यांचे राजकीय पुनर्वसन झाले.
पवारांच्या वर्चस्वाला बसली खीळ, हे तर खरे महाराष्ट्र केसरीच्या वादाचे मूळ!
परंतु, नाशिक मधल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी स्वतंत्र पक्षाची पुडी सोडून दिली. त्याला सध्याच्या धनंजय मुंडे प्रकरणाची पार्श्वभूमी राहिली. यातून कुठले प्रेशर टॅक्टिज पंकजा खेळत आहेत का??, असाही सवाल विचारला गेला. पण त्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातल्या राजकीय असंतुष्टांनी त्यामध्ये उडी घेतली. संजय राऊत आणि छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ओबीसी समाजासाठी स्वतंत्र पक्ष उभा राहत असेल, तर चांगलीच गोष्ट आहे, असे छगन भुजबळ म्हणाले, तर संजय राऊत यांनी पंकजा मुंडे यांना स्वतंत्र पक्ष उभारणीसाठी पुढाकार घ्यायला सांगितले.
संजय राऊत आणि छगन भुजबळ या दोन्हीही सत्तेबाहेर असलेल्या नेत्यांनी पंकजा मुंडे यांच्या स्वतंत्र पक्ष उभारणीच्या वक्तव्याला हवा दिली. पण त्यामुळे पंकजा या दोन्ही नेत्यांच्या नादी लागून स्वतंत्र पक्ष उभारणीचा उद्योग करतील का आणि आपल्या राजकीय पुनर्वसनालाच स्वतःच्या हाताने सुरुंग लावतील का??, हे खरे सवाल आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App