प्रतिनिधी
जालना : Jarange’s अवैध वाळू उत्खनन, चोरटी वाहतूक, शासकीय कामात अडथळा, धमकीचे गुन्हा दाखल असलेल्या ९ जणांना चार जिल्ह्यांतून हद्दपार करण्याची कारवाई अंबडचे उपविभागीय अधिकारी पुलकित सिंह यांनी केली. त्यांना जालना, संभाजीनगर, बीड, परभणी जिल्ह्यांत प्रवेशास मनाई केली. या नऊ जणांमध्ये मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यासह मराठा आंदोलनातील ७ जणांचा समावेश आहे. वामन तौर (२६), रामदास तौर (३०, शिवनगाव), संदीप लोहकरे (३३, अंबड), गोरख कुरणकर (२८, रा. कुरण), अमोल पंडित (३४, रा. अंकुशनगर), गजानन सोळुंके (४४, रा. गोंदी), संयोग सोळुंके (३५, रा. गोंदी, ता. अंबड), विलास खेडकर (३३, रा. गंधारी, ता. अंबड), केशव वायभट (३८, रा. अंकुशनगर) हे आरोपी अाहेत.Jarange’s
आंदोलकांना टार्गेट केले, फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम करणार : मनाेज जरांगे
जरांगे पाटील म्हणाले, ‘मी पाहुणारावळा मानत नाही, राज्यच माझे कुटुंब आहे. चुकीचं काम केलं तर बापावर जरी केस झाली तरी मी सोडणार नाही. पण मराठा आंदोलकांना नोटिसा देऊन माझं तोंड बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतोय. मी आरक्षण मागतो म्हणून माझे पाहुणेरावळे सापडतात का? फडणवीस साहेब, मराठ्यांना वेठीस धरायचे काम केले तर तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार. गद्दारीचा शिक्का तुमच्यावर पडू देऊ नका. फडणवीसांनी चूक सुधारावी.’
गुन्हा असेल तर कारवाई होणारच : मुख्यमंत्री
जरांगे यांच्या टीकेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘कोणाचा नातेवाईक आहे हे समजून अटक होत नसते. काही गुन्हे केले असतील तर त्यावर अटक होत असते. जालना जिल्ह्यात काय कारवाई झाली याबाबत मला याची माहिती नाही. मी योग्य माहिती घेऊन तुम्हाला सांगेन.’
२०१९ पासून गुन्हे
या आरोपींविरोधात २०१९ पासून अंबड, घनसावंगी आणि गोंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाळू चोरी, जिवे मारण्याचा प्रयत्न, अांतरवाली सराटीच्या आंदोलनात केलेली जाळपोळ यासह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जालना जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत.
विलास खेडकरवर ३ गुन्हे, ६ महिन्यांसाठी हद्दपार
२०२१ मध्ये अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक २०२३ मध्ये गोदावरी नदीतून ४ लाख ८१ हजार रुपयांची १०० ब्रास वाळू चोरी २०२३ जालन्यातील शहागड इथे बस जाळली २०२३ रोजी पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरीतून ५०० ब्रास वाळू चोरीचे गुन्हे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App