“पवार संस्कारित” इतर नेत्यांचे काढायचे वाभाडे; पण सगळी पदे पवारांच्याच घरात खेचायचे डाव खेळायचे!!, असला प्रकार पवार कुटुंबीयांकडून सुरू आहे.
२००६च्या मुंबईतील साखळी ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात महाराष्ट्र सरकारने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. २४ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात तात्काळ सुनावणीसाठी अपील केले होते.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, या सर्व शुभेच्छांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कौतुकाने. देवेंद्र फडणवीस हे अतिशय हुशार राजकारणी असून भविष्यात त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, असे उद्धव ठाकरे म्हणालेत. देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा ही एक गतिमान, अभ्यासू आणि पक्षनिष्ठ राजकारणी अशा शब्दांत ठाकरेंनी स्तुती केली.
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळ कामकाज सुरू असताना रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला असून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर माणिकराव कोकाटे यांनी आज पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले की मला रमी खेळता येत नाही. तसेच राजीनामा देण्यासारखे काय केले? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. इतकेच नव्हे तर माझी बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचणार असल्याचा देखील त्यांनी इशारा दिला. यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत थेट इशारा दिला आहे.
भाजप नेते तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हनी ट्रॅपच्या मुद्यावरून सरकारवर चौफेर टीका करणाऱ्या विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे. हनी ट्रॅप व पेन ड्राईव्ह या सर्व शिळ्या भाकरी आहेत. विरोधक मीडियातील आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वाढवून, चढवून बोलतात, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांना आपली उंची पाहून बोलण्याचाही उपरोधिक सल्ला दिला. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरही निशाणा साधला.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी हे अति डाव्या विचारसरणीने ग्रस्त असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेल्या जन सुरक्षा विधेयकाला आता काँग्रेस विरोध करत आहे. या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी ही टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षमतेचे, बुद्धीचातुर्याचे आणि राजकीय कौशल्याचे कौतुक केले आहे. Sharad Pawar
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र नायक ग्रंथात ज्येष्ठ नेते शरद पवारांनी फडणवीसांची स्तुती करणारा लेख लिहिला. देवेंद्र यांची कार्याची गती अफाट आहे
सोलापुरात एका फादरने महिलांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फॉर्मवर सही केल्यास दहा हजार रुपये देण्याचे आमिष देण्यात आले. याप्रकरणी त्या फादरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानसभेत रमी खेळण्याच्या व्हिडिओवर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. माणिकराव कोकाटे यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. पण त्यांनी काहीही सांगितले असले तरी ते आमच्यासाठी भूषणावह नाही, असे फडणवीस म्हणाले.
सामान्य माणूसही एक क्रिएटर झालेला आहे. त्याने सर्जनशीलतेच्या जोरावर स्वतःची एक स्वतंत्र स्पेस निर्माण केली आहे.क्रिएटर्स इकॉनॉमीचे जागतिक केंद्र बनण्याकडे महाराष्ट्र अग्रेसर आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
महादेव मुंडे खून प्रकरणात चौकशीसाठी आता मराठा आंदोलक मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. मुंडे यांचा खून होऊन दीड वर्ष उलटले तरी देखील तपास लागला नाही.
उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीला कंटाळून लवकरच अनेक आमदार पक्षाला निरोप देतील. ठाकरे गटाचे ७० ते ७५ टक्के खासदार आणि आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, असा दावा शिवसेनेचे ,( शिंदे गट,)उपनेते संजय निरुपम यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केला.
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहिलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ भूषणावह नाही, अशी परखड टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
“पवार संस्कारित” काढताहेत एकमेकांचे जुने हिशेब; मधल्या मध्ये खराब होतीय फडणवीस सरकारची इमेज!!, अशी महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था येऊन ठेपली आहे.
२००६ मध्ये मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये झालेल्या सात साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक आणि धक्कादायक निकाल दिला आहे. या स्फोटांमध्ये १८९ जणांचा मृत्यू झाला होता, तर ८२४ प्रवासी गंभीर जखमी झाले होते. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस.जी. चांडक यांच्या विशेष खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार या प्रकरणातील एकूण १२ आरोपींपैकी ११ आरोपी निर्दोष ठरवण्यात आले असून, एक आरोपी खटल्यादरम्यानच मरण पावला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट पत्ते उधळून आंदोलन केले. त्यानंतर छावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी जोरदार हाणामारी झाली.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंसाचार मारहाण वगैरे प्रकारांचा सोशल मीडियातून निषेध करून छावा संघटनेला “शांत” करायचा प्रयत्न केला
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंसाचार मारहाण वगैरे प्रकारांचा सोशल मीडियातून निषेध करून छावा संघटनेला “शांत” करायचा प्रयत्न केला, पण मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाण वर कारवाई करणार की नाही, याविषयी मौन बाळगले.
महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होऊ शकते अशी चर्चा सुरू आहे. 5 जुलै रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत विजयी मेळावा घेतला होता. जवळपास 20 वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले होते. शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठे विधान केले आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे कार्यकर्ते विजय घाडगे पाटील यांना मारहाण केली.
भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसलेल्या आणि भाजपने सत्तेबाहेर ठेवलेल्या पवार संस्कारितांची थांबेना दादागिरी; फडणवीस, लवकर साधा सफाईची संधी!!, असे म्हणायची वेळ दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या दादागिरीमुळे आली.
शासनाच्या विविध योजनांसाठी वितरित करण्यात आलेल्या १३,६४५.३३ कोटींच्या अनुदानाची उपयोगिता प्रमाणपत्रे विभागीय कार्यालयांनी आजपर्यंत सादर केलेली नाहीत. मुंबई वित्तीय नियम १९५९ नुसार कोणत्याही अनुदानाचा उपयोग झाल्यानंतर ते प्रमाणपत्र १२ महिन्यांच्या आत महालेखापाल कार्यालयाला पाठवणे बंधनकारक आहे. मात्र, शासन यंत्रणा याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचे कॅगच्या अहवालातून दिसते.
महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपले. या अधिवेशन काळात फडणवीस सरकारला अडचणीत आणायची संधी विरोधकांना पुरती साधता आली नाही
जगाला जर शांतता हवी असेल, तर हिंदू जीवनविचारांच्या आधारावरच पुढे जावे लागेल. याचे प्रारूप येत्या २५ वर्षांत संघ विकसित करेल, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय धर्मजागरण संयोजक शरदराव ढोले यांनी दिली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App