सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्यामुळे विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितला व तो त्यांना द्यावा देखील लागला. त्यानंतर पासून धनंजय मुंडे हे फारसे कुठल्या सामाजिक कार्यक्रमात फारसे आले नव्हते. आज त्यांना वंजारी समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात बोलावण्यात आले असता, भाषण करताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शहरातील खराडी परिसरात एका उच्चभ्रू गेस्ट हाऊसवर सुरू असलेल्या हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत सात जणांना अटक केली आहे. ‘स्टे बर्ड’ नावाच्या गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या या पार्टी दरम्यान, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, दारू आणि हुक्के जप्त केले आहेत.
विशेष प्रतिनिधी पुणे : Khadse’s Son-in-Law शहरातील खराडी परिसरात एका उच्चभ्रू गेस्ट हाऊसवर सुरू असलेल्या हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत सात जणांना अटक […]
माझ्यासह माझी जात व माझा जिल्हा एवढा बदनाम करावा? एक-दोन दिवस नाही, दोनशे दिवस एखाद्या जिल्ह्याची, एखाद्या व्यक्तीची, एखाद्या व्यक्तीच्या जातीची मीडिया ट्रायल कधीच कोणी केली नसेल, ते मी सहन केले. पण सत्य परेशान हो सकता है, पराजित नही, असा विश्वास माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
“पवार संस्कारित” नेत्यांची मंत्रिपदासाठी तगमग; राष्ट्रवादीने फक्त मराठ्यांना वापरल्याची आत्ता आली समज!!, असे म्हणायची वेळ पवार संस्कारित नेत्यांच्या वक्तव्यातून समोर आली.
पुण्यात रेव्ह पार्टी प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक झाली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांवर सातत्याने टीका करणाऱ्या एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना मोठा धक्का बसला
भर उन्हाळ्यातल्या व्हॅलेंटाईनच्या गुलाबाचे काटे श्रावणामध्ये झडले; मातोश्रीवर लाल गुलाबांचे बंधू प्रेम फुलले!!, असे आज घडले.
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 70 वर्षांमध्ये जेवढी महाराष्ट्राची बदनामी झाली नाही, तेवढी बदनामी महायुती सरकारच्या 150 दिवसांच्या कारकिर्दीत झाली असा “जावईशोध” शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लावला.
मी अफझल गुरुला आणि कसाबला फाशी दिली, पण लोकसभा निवडणुकीत काही दळभद्री विरोधकांनी याच कसाबची बाजू घेतली,” असा घणाघात भाजपा खासदार आणि ज्येष्ठ विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला.
विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळण्याप्रकरणी अडचणीत सापडलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपला अजित पवारांवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत आपल्या राजीनाम्याची चर्चा फेटाळून लावली आहे. या प्रकरणी त्यांनी आपल्या समर्थकांना शक्तीप्रदर्शन करण्याची काहीच गरज नसल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी सिन्नर येथील आपला मेळावा रद्दबातल केला आहे.
राहुल गांधी यांची टीका म्हणजे राजकीय अपरिपक्वतेचे, नैराश्याचे आणि त्यांच्या अपयशाचे जिवंत उदाहरण असल्याचे भाजपचे नेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे मोदी, ‘शो’ नाहीतर ‘विकासाचा रोड शो’ असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी मोदींवर टीका करत त्यांच्यासाठी ‘गुब्बारा’ शब्द वापरला होता. यावरुन बावनकुळे यांनी पलटवार केला आहे.
उद्धव ठाकरेंचे अनेक आमदार आणि खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. केवळ तांत्रिक कारणांमुळे ते ठाकरे गटात असल्याचेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात सामावून घेण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. धनंजय यांच्या दुसऱ्या पत्नी करूणा शर्मा मुंडे यांनी याला कडाडून विरोध केला आहे. अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद देण्यापूर्वी आम्हाला विष द्यावे, असे त्या म्हणाल्यात.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज (शनिवार) दुपारी खोपोली परिसरातील बोरघाटात एक अत्यंत भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झालेल्या एका कंटेनरने 25 ते 30 हून अधिक वाहनांना जोरदार धडक दिली, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या अपघातात सुमारे 30 ते 35 प्रवासी जखमी झाले असून, एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, अद्याप पोलिसांकडून याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सध्या माजी मंत्री एकनाथ खडसे आणि विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या या मालिकेत आता खडसेंनी महाजनांना तीन मोठी आव्हानं दिली आहेत.
हिंजवडीचं लवासा झालाय का??, असा सवाल विचारायची वेळ पुतण्याने काढलेल्या काकांच्या विकासाच्या दृष्टीच्या वाभाड्यांमुळेच समोर आली. प्रचंड पाऊस आणि आपत्ती निवारण नियोजनाचा बट्ट्याबोळ यामुळे हिंजवडीची झालेली दुर्दशा पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज पहाटे 6.00 वाजताच हिंजवडीत पोहोचले. तिथे त्यांनी सरपंचांना सकट सगळ्यांना झापले. आपलं वाटोळ झालंय.
राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चां सध्या सुरू आहेत. , आठ मंत्र्यांना डच्चू दिला जाईल, असे या सामना या शिवसेना ठाकरे गटाच्या मुखपत्रात म्हटले आहे. यामध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे नावही घेतले गेले आहे. सामनामध्ये बातमी आली म्हणजे काहीतरी होणार असा अर्थ कधीच होत नाही, असा टोला शिरसाट यांनी लगावला आहे.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांना कृषि खात्यातील भ्रष्टाचाराप्रकरणी मिळालेल्या कथित क्लीनचिटवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. धनंजय मुंडे हे कोणत्याही अंगाने स्वच्छ नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ नका, असे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला बजावले आहे. त्यांनी
राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असून काही मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. याबाबत पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारले असता या संदर्भातील सर्व अधिकार हे मुख्यमंत्री यांचे असतात. त्यामुळे मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचे आणि कोणाला काढायचे?
अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने आपली कवाडे बंद केली आहेत. अजित पवार यांनी स्वतः आपल्याला हा शब्द दिल्याचा दावा विजय घाडगे यांना केला आहे. सोबतच विधिमंडळात रमी खेळण्याचा आरोप झालेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरही मंगळवारपर्यंत योग्य ती कारवाई करणार असल्याचे आश्वासन अजित पवारांनी दिल्याचे घाडगे म्हणाले.
धनंजय मुंडे यांना सत्यमेव जयते असे म्हणणे शोभत नाही. ते कोणत्याही अंगाने क्लिन अर्थात स्वच्छ नाहीत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी देऊ नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित सुमारे ५० कंपन्यांवर आणि ३५ ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) २४ जुलै रोजी मोठी कारवाई केली. ही कारवाई मुंबई आणि दिल्लीतील विविध ठिकाणी करण्यात आली असून, यामागे ३००० कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीचा आरोप आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जेव्हा रस्ते बांधकामात निष्काळजीपणा होतो, तेव्हा फक्त कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांविरुद्धच एफआयआर का दाखल करण्यात आला? सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांची जबाबदारी का निश्चित करण्यात आली नाही?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होईल. चार वादग्रस्त मंत्र्यांबरोबरच अन्य चार मंत्र्यांना हे नारळ देण्यात येईल, अशा गौप्यस्फोटाच्या बातम्या वेगवेगळ्या सूत्रांच्या हवाल्यांनी मराठी माध्यमांनी पेरल्या.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App