महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने या व्यवसायाला आता शेतीचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे आता मत्स्य व्यवसायाला देखील शेतीप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स भारताच्या दौऱ्यावर आलेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेलेत. या पार्श्वभूमीवर जम्मू कश्मीर मधल्या पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे गांभीर्य फार मोठे आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
राज ठाकरेंनी विचारलेल्या राज की उद्धव??, या प्रश्नावर शरद पवारांनी उत्तर दिले होते “ठाकरे कुटुंबीय”, पण आता जेव्हा दोन्ही भाऊ एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी मात्र पवारांनी कानावर हात ठेवले.
राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!, अशी आज तरी ठाकरे बंधूंच्या ऐक्याची अवस्था झाली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था सध्या 1980 च्या दशकातल्या चव्हाण + रेड्डी काँग्रेस सारखी झालीय. कारण त्यांच्या राष्ट्रवादीच्या गळतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती होत चाललीय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री राज्य अतिथीगृह, मुंबई येथे ‘नागरी सेवा दिन 2025 आणि राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2023-24 व 2024-25 पारितोषिक प्रदान’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. स्पर्धेतील विजयी अधिकाऱ्यांना त्यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना नागरी सेवा दिनाच्या शुभेच्छा देत, संबोधित केले.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष मनोज कुमार यांनी सोमवारी गेल्या आर्थिक वर्षातील खादी इंडियाचे आकडे सादर केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
सोमवारी सोन्याच्या किमतींनी नवीन उच्चांक गाठला आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत पहिल्यांदाच ९७,००० रुपयांच्या जवळ पोहोचली.
अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच रोहित पवार समर्थक नगराध्यक्षा उषा राऊत यांनी कर्जत जामखेड मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला.
ठाकरे बंधूंच्या एकीच्या गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!, असे म्हणायचे म्हणायची वेळ ठाकरे बंधूंच्या ऐक्याच्या चर्चेला फुटलेल्या फाट्यांनी आणली.
उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेनंतर महाराष्ट्रात पवार काका – पुतण्याच्या राजकीय ऐक्याची चर्चा सुरू झाली.
महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत महाराष्ट्रातील 10 हजार गरजू महिलांना पिंक ई रिक्षाचे वाटप केले जाणार आहे. नागपूर येथून दिनांक 20 एप्रिल रोजी गरजू महिलांना सवलतीच्या दरात पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याच्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात सध्या मराठी आणि हिंदी भाषेचा वाद सुरू आहे. हिंदीच्या सक्तीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र देखील पाठवले आहे.
काँग्रेस पक्षात मला सातत्याने डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाच्या राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आज आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे अधिकृत जाहीर केले आहे. यावर आता कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत संग्राम थोपटे यांना सल्ला दिला आहे.
मुख्यमंत्री सचिवालयातर्फे ‘पब्लिक ग्रीव्हन्सेस रिड्रसल सिस्टिम’ (PGRS) याबाबत सादरीकरण करण्यात आले
ठाकरे बंधू एकत्र, पवार + काँग्रेस अस्वस्थ!! अशी खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या विरोधकांची एकत्रित गोची झाली आहे. वास्तविक शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीच्या सत्तेला आव्हान देण्यापेक्षा आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी राज आणि उद्धव हे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या गप्पा मारत आहेत
ईश्वरी ऊर्फ मोनाली संतोष भिसे (३७) मृत्यू प्रकरणात वेगवेगळे चार चौकशी अहवाल पुणे पोलिसांना प्राप्त झाले. यामध्ये राज्य सरकारने नेमलेल्या आरोग्य विभागाच्या चौकशी समितीकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि प्रसूती तज्ज्ञ डॉ. सुश्रुत दिलीप घैसास यांच्यावर दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला. परंतु ससून रुग्णालयाने केलेल्या चौकशीत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व डॉ. घैसास यांच्यावर दोष न ठेवता इतर ३ रुग्णालयांवर खापर फोडले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे ’22वा मुंबई लाईव्ह एंडोस्कोपी 2025 पुरस्कार सोहळा’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
राज ठाकरेंनी महेश मांजरेकर यांना एक मुलाखत काय दिली आणि त्यावर उद्धव ठाकरेंनी लगेच जाहीर भाषणातून प्रतिसाद काय दिला
महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरं तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवण्याची तयारी!! हा असला प्रकार राज ठाकरे यांच्या मुलाखतीनंतर आज अचानक सुरू झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्यासमवेत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ’ येथे विविध पुरस्कारांचे वितरण केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासमवेत छत्रपती संभाजीनगर येथे चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (CMIA) आयोजित, ‘उद्योजक संवाद’ कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App