माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फारच प्रतिष्ठेची केल्यानंतर तिच्यात चुरस निर्माण झाली. भाजपचे नेते चंद्रराव तावरे यांच्या पॅनलचे आव्हान अजितदादांना जड वाटायला लागले.
गुंठामंत्री आणि हुंडाबळी यामुळे मुळशी नावाचे गाव फार बदनाम झाले. जमिनीतले घोटाळे आणि गैरव्यवहार म्हणजे “मुळशी पॅटर्न”, जमीन हडपण्यासाठी आणि हुंड्यासाठी बळी घेणे म्हणजे “मुळशी पॅटर्न”, अशी नवी व्याख्या रुजली.
मावळमधील कुंडमाळा गावाजवळ मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 40 पेक्षा जास्त लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच, यातील 38 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 38 जणांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एक गंभीर जखमी असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे. तसेच, या दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदत देणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डूडी यांनी दिली.
जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ रविवारी दुपारी 3:30 वाजता इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला.पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, साडेतीन वाजता अशी दुर्घटना घडल्याची माहिती आम्हाला मिळाली आणि त्यानंतर आम्ही सक्रिय झालो असून तेव्हापासून बचावकार्य युद्धपातळीवर सुरूच आहे. तर आतापर्यंत 38 पर्यटकांना रेस्क्यू करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडेला लागून असलेल्या कुंडमाळा परिसरात रविवारी एक जुना लोखंडी पूल कोसळला. हा पूल इंद्रायणी नदीवर बांधण्यात आला होता, जिथे पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पूल कोसळला. हा पूल अनेक महिन्यांपासून वाहनांसाठी बंद होता
वयाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चंद्रराव तावरेंवर टीका केली, पण त्याआधी त्यांनीच चंद्ररावांच्या नाकदुऱ्या काढल्या होत्या ही वस्तुस्थिती समोर आली.
चिंचवड भागात आज (१५ जून) संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. इंद्रायणी नदीवरील पूल नदीत कोसळला, ज्यामुळे अनेकजण वाहून गेले आहेत.
महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकत्र येवोत किंवा न येवोत, महाविकास आघाडी होवो किंवा न होवो उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेनेचे 300 चे गणित मांडून शाखाप्रमुख यांना मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कामाला लावले.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आमदार आणि खासदार यांच्यात एकमेकांमध्ये नाही पायपोस; पण जयंत पाटील म्हणाले मुंबईत भाजपला आणखी लोकांची गरज!!, असला प्रकार समोर आला.
अहमदाबाद येथील विमान अपघातात सायबर हल्ल्याची भीती व्यक्त करत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अपघात अहमदाबाद येथेच कसा झाला? या विमानतळाची देखरेख करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला. या माध्यमातून संजय राऊत यांनी विमान अपघाताच्या प्रकरणात केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
एकीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे अजून आपापल्या पक्षांच्या एकी-बेकीचीच चाचपणी करताहेत, तर दुसरीकडे भाजपने संघाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर समन्वयाची बैठक घेऊन राज्यातल्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तयारी देखील सुरू केली आहे.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी एक धक्कादायक विधान करत म्हटले आहे की, “उद्धव ठाकरे यांनी मला बोलावले तर मी नक्की त्यांना भेटायला जाईन.” त्यांनी स्पष्ट केले की, ते राजकारण आणि वैयक्तिक नाती यामध्ये गोंधळ करत नाहीत. त्यामुळे त्यांनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
उद्धव आणि राज हे दोन भाऊ एकत्र येण्याबद्दल आम्ही आशावादी आहोत. मात्र दोन भाऊ व दोन्ही पक्ष हे एकत्र येणार नाही यासाठी भाजपा प्रयत्न करीत आहे, असा आरोप उबाठा नेते भास्कर जाधव यांनी येथे माध्यमांशी बोलताना केला. घराघरात भांडणे लावून राजकीय स्वार्थ कसा साधता येईल याचा विचार भाजप करीत आहे. राज व उद्धव ठाकरे एकत्र आले तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ५४ टक्के मते या दोन भावांना मिळतील, असा सर्व्हे आहे, त्यामुळे भाजप घाबरलेला आहे, असे जाधव यांनी सांगितले.
येथे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एक धक्कादायक आरोप करत पोलिस प्रशासन आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, “माझ्यावर दाखल झालेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा हा केवळ राजकीय दबावामुळे दाखल करण्यात आला आहे.” यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हे प्रकरण उच्च न्यायालयात नेण्याचा इशारा दिला.
“आज पैसा नाही तर माणूस हेच खरे भांडवल आहे. उद्योगधंदे तिथेच जातात जिथे प्रशिक्षित कामगार, संशोधन आणि नवकल्पना असतात. त्यामुळे गुणवत्तापूर्ण आणि बहुविध कौशल्य असलेली कार्यबल तयार करणे अत्यावश्यक आहे. यामुळे मानव संसाधन विकास हीच खरी गुंतवणूक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज(शनिवार) मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रात कॅम्पस स्थापन करण्यासाठी 5 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना ‘लेटर ऑफ इंटेंट’ (LOIs) प्रदान केले. हा कार्यक्रम ‘मुंबई रायझिंग – क्रिएटिंग अॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’ अभियानांतर्गत आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदाबाद-लंडन विमान अपघातसारख्या कठीण प्रसंगी भारताच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल जागतिक समुदायाचे आभार मानले.
अहमदाबाद येथील भीषण विमान अपघातामागे सायबर हल्ला असू शकतो, अशी गंभीर शंका शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवारांची कॉपी हाणली, पण निदान ती कॉपी करण्याची वडेट्टीवार यांची कारणे तरी मोठी निघाली.
पुण्यात मुसळधार पावसामुळे आणि सध्याच्या आरोग्यविषयक आव्हानांमुळे जनतेला सावध राहण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. शुक्रवारी रात्री पावसामुळे पुणे शहरातील अनेक भागांमध्ये, विशेषतः हिंजवडीमध्ये पाणी साचले होते, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) NCP SP अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाजप सोडून इतर पक्षांशी युती करायची तयारी केली, त्याबरोबर पवारांच्या आमदारांच्या मनात वेगळीच भीती रुतून बसली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्यास पक्ष सकारात्मक असल्याचे पक्षातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही पर्याय असणार आहे. यामुळे काका-पुतणे एकत्र येणार का? याची चर्चा सुरू आहे.
अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. या विमानाला जगभरात बंदी असताना भारतात डीजीसीएने आधीच कारवाई का केली नाही? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. इतकेच नाही तर कोणत्याही दबावाला बळी न पडता आता तरी तात्काळ या विमानांची सेवा खंडित करून देण्यात आलेल्या ऑर्डर रद्द करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांना सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपले. या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. काही ठिकाणी तर वाहने अक्षरशः पाण्यात वाहून गेल्याचे पाहायला मिळाले. दिवे घाटात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने रस्त्यांना ओढ्यांचे स्वरूप आले, तर पुण्याच्या आयबी गेस्ट हाऊसमध्येही पाणी शिरले होते.
नागपुरात सुमारे ८ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. पुढील वर्षी २०२६ पर्यंत कारखाना सुरु होण्याची शक्यता आहे. ८ हजार कोटींची ही गुंतवणूक येत्या आठ वर्षात टप्प्प्याटप्याने होणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागात नागपूरमध्ये हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून सुटली “नवी राजकीय पुडी”; भाजपचे मित्र पक्ष फोडायला शिंदे आणि अजितदादांच्या हातात घालणार युतीची नवी बेडी!!, असला प्रकार शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून आता समोर आलाय
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App