शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपवर टीकेची झोड उठवण्यात आली. सुधाकर बडगुजर यांचा 1993 च्या मुंबई ब्लास्टमधील आरोपी सलीम कुत्तासोबतचे फोटो भाजप नेते नितेश राणे यांनी दोन वर्षांपूर्वी समोर आणले होते तसेच तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची देखील घोषणा केली होती. परंतु तेच आता भाजपमध्ये गेले आहेत. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे.
विशेष प्रतिनिधी मुंबई : Manikrao Kokate राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. शेतकऱ्यांनी कर्ज भरायलाच हवे, असे ते म्हणालेत. […]
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. वारीमुळे रस्ते जाम होतात, पण मुस्लीम समाज कधीच तक्रार करत नाही. मात्र जर मुसलमानांनी नमाज पठण केले, तर तक्रार होते, असे विधान अबू आझमी यांनी केले. या याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आझमी यांच्यावर सडकून टीका केली. अबू प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्ये करतात, मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही, असा टोला फडणवीसांनी लगावला.
मुलगी आत्महत्या करते आणि आपण अजूनही हुंड्याविषयी बोलतोय, हीच आपल्या समाजाची शोकांतिका आहे, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी हुंडा प्रथेवर ताशेरे ओढले. तर महाराष्ट्र हुंडामुक्त व्हावा यासाठी समाजाच्या सर्व स्तरावर प्रयत्न होणं आवश्यक आहे. पुण्यात एका सुशिक्षित कुटुंबातील मुलीने केवळ हुंड्याच्या दबावामुळे आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.
राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनीच एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता, असा खळबळजनक दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी देखील संजय राऊतांबद्दल असाच काहीसा दावा केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 480 (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) ‘स्वप्न निकेतन’ सदनिकांचे हस्तांतरण व विविध विकासकामांचे लोकार्पण केले.
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करून स्वतःचाच चेअरमन पदाची बेगमी करून ठेवली पण त्याचवेळी अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चेची फुसकुली पुन्हा हवेत सोडली गेली.
स्वतःचा बारामती मतदारसंघ सोडून कर्जत जामखेड सारख्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मतदारसंघात राजकीय “घुसखोरी” करून आमदारकी मिळवलेल्या शरद पवारांच्या नातवाला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी पाचव्यांदा धोबीपछाड दिला.
अमेरिकेने आता इराण आणि इस्रायलमधील युद्धात उडी मारली आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला केला आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. संजय राऊत यांनी विचारले आहे की जेव्हा इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे, तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यात सहभागी होण्याची काय गरज आहे?
आयत्या मिळालेल्या सत्तेची अजितदादांच्या राष्ट्रवादीला खुमखुमी, स्वतःचे नाक कापून नागपुरात भाजपचे उमेदवार पाडायची तयारी!!, अशी चिन्हे खरंच दिसून राहिली आहेत. कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कारनामेच तसे चालवले आहेत.
माळेगाव साखर कारखान्यावर वर्चस्वासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे या दोघांच्या पॅनेलमध्येच टफ फाईट आहे. या दोघांच्या टफ फाईट मध्ये बारामतीचे सर्वेसर्वा मानले गेलेले शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे स्थानिक राजकारणात तरी पराभवाच्या छायेत आलेत. तिथे आज मतदान होत आहे.
राज्यातील शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्ती करण्याच्या निर्णयावरून वाद चिघळला असून, या निर्णयाला मराठी अस्मिता विरोधात राबवला जाणारा कट ठरवत शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
पावन गंगा-गोदावरीच्या तीरावर दररोज भक्तिभावाने संपन्न होणारी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची महाआरती आज विशेष उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात झाली.
मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनयाद्वारे प्रसिद्धी मिळवणाऱ्या तुषार घाडीगावकरने शुक्रवारी आत्महत्या केली. काम न मिळाल्याच्या ताणामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. त्याच्या अचानक निधनाने मराठी मनोरंजन विश्वासह त्याचे कुटुंब, मित्र आणि चाहत्यांना धक्का बसला आहे.
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे,” असे अमित शहांनी म्हटले. त्याचबरोबर, मुंबईवर अनेक वर्षे राज्य करणाऱ्यांनी शहरासाठी काय केले, असा सवाल उपस्थित करत त्यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर टीका केली.
हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज्यात आकांडतांडव माजले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यासंबंधीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हिंदी भाषेची सक्ती असू नये. पण हिंदी भाषेचा द्वेष करणे हे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. या प्रकरणी कुणी स्वतःहून हिंदी शिकत असेल, तर त्याला नाही म्हणण्याचे कोणतेही कारण नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या खंडणी प्रकरणात पोलिसांनी राजधानी दिल्लीतून एका मांत्रिकाला अटक केली आहे. याच मांत्रिकाच्या इशाऱ्यानुसार एका महिलेने गोरे यांच्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप आहे. साताऱ्यातील वडूज पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे या प्रकरणी अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नुकतेच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर मालमत्तेसंबंधी गंभीर आरोप केले होते. आता याला प्रत्युत्तर म्हणून वंचित बहुजन आघाडीने खुद्द जलील यांच्यावरच कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवल्याचा आरोप केला आहे. वंचितचे स्थानिक पदाधिकारी अफसर खान यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “इम्तियाज जलील ५ वर्षे खासदार आणि ५ वर्षे आमदार होते. या १० वर्षांत त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी कुठून आली?”
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवर टीका केली होती. मराठी माणसांची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकांचे नोकर भेटीगाठी घेत आहेत,
2019 ची विधानसभा निवडणूक भाजप सोबत महायुती मधून लढवून देखील भाजपला सोडून शरद पवारांबरोबर जाताना उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना विचारले नाही.
ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनसेच्या प्रमुख राज ठाकरे यांना चांगलेच अंगावर घेतले आहे. राज यांच्या विरोधातील तक्रारीनंतर मनसे कार्यकर्त्याकडून धमकी देण्यात आली आहे. राज ठाकरे यांना सुधारायला सांगा असा सल्ला सदावर्ते यांनी धमकी देणाऱ्या कार्यकर्त्याला दिला.
मुंबईत ठाकरे बंधू अजून एकत्र येईनात, तोच शरद पवारांनी घातला त्यांच्यात महाविकास आघाडीचा खोडा!!, असे आज बारामतीतून घडले. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा महाराष्ट्राच्या राज्याचे वातावरणात रंगत असतानाच शरद पवारांनी महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे, काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आणि अन्य छोट्या पक्षांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे वक्तव्य शरद पवारांनी बारामतीत केले.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीतली PDCC बँक रात्री 11.00 वाजता उघडली. त्यावरून काका – पुतण्यांमध्ये वाद उसळला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदास संजय राऊत यांनी कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्यावर केलेला अघोरी पूजेचा आरोप सत्ताधारी शिवसेनेने जोरकसपणे फेटाळून लावला आहे. भरत गोगावले हे पूजापाठ करणारे आहेत. पण मातोश्रीचे बंगाली बाबा कनेक्शन काय आहे हे संजय राऊतांनी सांगावे. मातोश्रीवर रोज एका बंगाली बाबाचा वावर असतो. या बाबाच्या सूचनेनुसार उद्धव ठाकरे यांचे सर्वकाही ठरते, असे शिवसेना नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
ठाकरे ब्रँडची खेचाखेची, पण इतरांच्या हातात जाऊच का दिली सत्तेची गुरुकिल्ली??, असा सवाल विचारायची वेळ उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांच्या भाषणांनी आज आणली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App