आपला महाराष्ट्र

आधुनिक भगीरथाचा सन्मान; जल तज्ज्ञ महेश शर्मांना रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचा राष्ट्रजीवन पुरस्कार प्रदान!!

विशेष प्रतिनिधी नाशिक : देशातील नद्या या अध्यात्मिक प्रेरणा आणि सांस्कृतिक उत्थानाचे केंद्र आहेत. त्यांना प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. नाशिक […]

Devendra Fadanavis

Devendra Fadanavis : देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला; दिल्लीतील पराभवाची कल्पना आल्याने फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न

लवकर दिल्लीतील विभानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत त्यांचा पक्ष पराभूत होईल, हे त्यांना माहिती आहे. त्यासाठी आधीच नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.

Aditi Tatkare

Aditi Tatkare : लाडकी बहीण योजनेतून 5 लाख लाभार्थी वगळले; अदिती तटकरे यांची माहिती

महायुती सरकारच्या महत्त्वकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून सुमारे 5 लाख लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी दिली

Shinde

Shinde :शक्तिपीठ मार्ग शेतकऱ्यांवर लादणार‎ नाही, चर्चेतून समस्या सोडवणार, नांदेडमध्ये DCM शिंदेंचे वक्तव्य

शक्तिपीठ महामार्ग कुठल्याही परिस्थितीत लोकांवर‎जबरदस्तीने लादला जाणार नाही. काही ठिकाणी विरोध‎असेल तर शेतकरी व स्थानिकांसोबत चर्चा होईल.‎विरोध कायम राहिला, तर त्या भागातील अलायमेंट‎बदलले जाईल. मराठवाड्यातील जिल्ह्यांना‎विकासाकडे नेणारा हा महामार्ग आहे. समृद्धी‎महामार्गाच्या वेळीही असाच विरोध झाला होता.

CM Fadnavis

CM Fadnavis : CM फडणवीसांचे उद्योजकांना आश्वासन, उद्योगपतींना त्रास देणारा महायुतीचा असला तरी मकोका लावणार!

आम्हाला ब्लॅकमेल केले जात आहे, त्रास दिला जातोय, वसुली केली जात आहे, अशा तक्रारी उद्योजकांकडून आमच्याकडे येत असतात. मात्र, हे खपवून घेतले जाणार नाही. उद्योगांना त्रास देणारा महायुतीचा किंवा इतर कोणत्याही पक्षाचा असूद्यात, त्याला सोडू नका. त्यांच्यावर थेट मकोका लावा. या लोकांवर मकोकाच्या खालची कारवाईच करू नका, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोलिसांना दिली.

माहेरच्या गोदेकाठच्या संस्कारातूनच पुढे आणखी चांगले कार्य; जुन्या आठवणींना उजाळा देत सत्कारमूर्ती विजयाताईंची ग्वाही!!

समस्त नाशिककरांसाठी एक अनोखा सन्मान सोहळा गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये रंगला.

Bawankule's

Bawankule’s : औद्योगिक जमीन वापरासाठी एनए परवानगी आवश्यक नाही! वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यासाठी मुदतवाढ; महसूलमंत्री बावनकुळे यांचा निर्णय

औद्योगिक जमिनीचा वापर करावयाचा असल्यास त्यासाठी बिगरशेती (एनए) परवानगी आवश्यक असणार नाही. याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल करण्यात येणार आहे.

Vijaya Rahatkar राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांचा आज रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने नागरी सत्कार!!

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शून्यातून समाजसेवेचा आणि स्त्री सेवेचा भव्य दिव्य असा संसार थाटणाऱ्या माहेरवाशीण सौ. विजयाताई रहाटकर यांचा रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

Udayanraje

Udayanraje : शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना ठेचून काढलं पाहिजे, अभिनेता राहुल सोलापूरकरच्या वादग्रस्त विधानावर उदयनराजे संतापले

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत मराठी अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी केलेल्या विधानामुळे सध्या संताप व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन केलं जात असून नाक घासून माफी मागावी अशी मागणी होत असतानाच दिल्ली येथे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत आपला तीव्र निषेध नोंदवला आहे.

Prayagraj Kumbhmela

प्रयागराज महाकुंभमेळ्यात निनादणार जनजाती संस्कृती रक्षणाचा शंखनाद; 6 ते 10 फेब्रुवारी भव्य जनजाती सत्संग!!

प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने 6 ते 10 फेब्रुवारीपर्यंत भव्य जनजाती सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे.‌

Vijayatai Rahatkar

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर‌ आजपासून ४ दिवस नाशिक, संभाजीनगर दौऱ्यावर, महिला कायदे अंमलबजावणीसंबंधी सरकारी बैठकांचा धडाका!!

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर‌ आजपासून ४ दिवस नाशिक, संभाजीनगर दौऱ्यावर, महिला कायदे अंमलबजावणीसंबंधी सरकारी बैठकांचा धडाका!!

Shirish More

Shirish More : संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज शिरीष मोरेंची गळफास घेऊन आत्महत्या

काही दिवसांत त्यांचे लग्न होणार होते. विशेष प्रतिनिधी पुणे : Shirish More महाराष्ट्रातील पुणे येथील तीर्थक्षेत्र देहू येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे […]

Devendra Fadnavis

बीड जिल्ह्यातल्या राजकीय साठमारीत अवतरली बॉलीवूड, ऐतिहासिक आणि पौराणिक पात्रे; फडणवीसांसमोर रंगली जुगलबंदी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : बीड जिल्ह्यातल्या राजकीय साठमारीत आज आष्टी मध्ये अवतरली होती बॉलीवूड मधली, ऐतिहासिक आणि पौराणिक पात्रे. या सगळ्यांची जुगलबंदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

पवारांच्या वर्चस्वाला बसली खीळ, हे तर खरे महाराष्ट्र केसरीच्या वादाचे मूळ!!

वर्षानुवर्षे कब्जा करून बसलेल्या शरद पवारांच्या वर्चस्वाला महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेत खीळ बसली, हेच खरे महाराष्ट्र केसरीच्या वादाचे मूळ असल्याचे आता उघड्यावर आले आहे.

Fadnavis said

Fadnavis said : फडणवीस म्हणाले- आपला पक्ष प्रामाणिकपणे संघटन राबावतो, संविधान अनुरूप व्यवस्था उभा करणारा एकमेव पक्ष म्हणजे भाजप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे प्रदेश कार्यशाळेत उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्य नोंदणीवर भाष्य केले आहे.

Fadnavis government

Fadnavis government : फडणवीस सरकारचे मोठे यश, मागेल त्याला सौर कृषी पंप, शंभर दिवसांचे उद्दीष्ट 60 दिवसांत पूर्ण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने निश्चित केलेल्या शंभर दिवसांच्या उद्दीष्टांपैकी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजने’त 52,705 सौर पंप बसविण्याचे उद्दीष्ट महावितरणने 60 दिवसात पूर्ण केले, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

Dhananjay Munde

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ, पीकविमा घोटाळ्याची केंद्राकडून चौकशी, लोकसभेत घोषणा

तत्कालीन शिंदे सरकारमध्ये धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना राज्यात ५ हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता. तर विद्यमान कृषिमंत्री माणिकराव काेकाटे यांनीही ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचे मान्य केले

Chief Minister Fadnavis

Chief Minister Fadnavis : भाजप कार्यशाळेस काही आमदारांची अनुपस्थिती; मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावले खडे बोल, स्पष्टीकरण देण्याचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघटन पर्व प्रदेश कार्यशाळेत भाजपचे जे आमदार गैरहजर होते त्यांना चांगलेच सुनावले असल्याचे समोर आले आहे. मुंबई येथे प्रदेश कार्यशाळेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी भाजप पक्षातील संघटन कौशल्यावर भाष्य केले, मात्र दुसरीकडे याच पक्षातील काही आमदार कार्यक्रमात अनुपस्थित असल्याचे दिसून आले.

Chief Minister devendra fadanvis 

Chief Minister devendra fadanvis : मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी केले MAITRI 2.0 पोर्टलचे लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत MAITRI 2.0 (Maharashtra Industry, Trade and Investment Facilitation Cell) च्या http://maitri.maharashtra.gov.in या नूतनीकृत पोर्टलचे लोकार्पण केले. राज्यातील गुंतवणूकदारांना उद्योगासंबंधी परवाने, मंजुरी आणि आवश्यक सेवा सुलभ करण्यासाठी हे पोर्टल एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

राजीव गांधींच्या 21 व्या शतकाच्या भाषणबाजीची लक्ष्मण कार्टूनने उडवली खिल्ली; मोदींनी लोकसभेत सांगितली कहाणी!!

राजीव गांधींच्या 21व्या शतकाच्या भाषणबाजीची लक्ष्मण कार्टूनने उडवली खिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत सांगितली कहाणी!!

UCC

UCC : महाराष्ट्रातही समान नागरी कायदा, लवकरच एकत्र बसून निर्णय; एकनाथ शिंदेंचे सूतोवाच!!

उत्तराखंड राज्याने समान नागरी कायदा लागू केला. त्यापाठोपाठ गुजरात सरकारने देखील त्यांच्या राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी ड्राफ्टिंग कमिटी नेमली. त्या संदर्भात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहमंत्री हर्ष संघवी यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली.

Punyashlok Ahilya Devi Holkar

Punyashlok Ahilya Devi Holkar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्म-त्रिशताब्दीनिमित्त ९ फेब्रुवारीला चौंडीत राष्ट्रीय परिषद; देशभरातील ४०० कर्तृत्ववान महिलांचा सहभाग!!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्म वर्षानिमित्त चौंडी (जि.अहिल्यानगर) येथे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी ९ फेब्रुवारीला सकाळी १० ते सायंकाळी ५.०० यावेळेत होणाऱ्या परिषदेला देशभरातील ४०० कर्तृत्ववान महिलांचा सहभाग असेल, अशी माहिती महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थचे कार्याध्यक्ष रवींद्र देव यांनी दिली.

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : महाराष्ट्रात सरकारी, निमसरकारी कार्यालयांमध्ये आता मराठी बोलणे सक्तीचे

महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस सरकारने मराठी भाषेचे काटेकोर पालन करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली आहेत. जर कोणी राज्यातील कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी कार्यालयात कोणत्याही कामासाठी गेला तर त्याला फक्त मराठी भाषेत बोलावे लागेल.

गोदातटीच्या माहेरवाशीणीचा गौरव; राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकरांचा नाशिक मध्ये गुरुवारी भव्य सन्मान सोहळा!!

गोदातटीच्या माहेरवाशीणीचा गौरव करण्याची अप्रतिम संधी लवकरच नाशिककरांना मिळणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांचा नाशिकमध्ये गुरुवारी भव्य सत्कार सोहळा आयोजित केला आहे.

Maharashtra

Maharashtra : महाराष्ट्रात GB सिंड्रोममुळे आतापर्यंत 5 बळी; आसाममध्ये 17 वर्षीय मुलीचा मृत्यू

देशातील 5 राज्यांमध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) रुग्ण आढळले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील इतर भागात त्यांची संख्या 149 झाली आहे. मृतांचा आकडाही 5 वर पोहोचला आहे.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात