बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना भाजप खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आरोप झाले की लगेच राजीनामा घेण्याची पद्धत अत्यंत चुकीची असल्याची भूमिका मांडली आहे.
परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात सुरू असलेला मोर्चा शांत करण्याचे काम मी करत होतो. मात्र, जितेंद्र आव्हाड यांना केवळ रॉकेल टाकण्याचा धंदा येतो का? असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी विचारला आहे. मोर्चा शांत करण्याचा प्रयत्न मी करत होतो. मात्र जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्र शांत राहिलेला नको का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
‘महालक्ष्मी सरस’ हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम झाला आहे. राज्यभरातील बचत गटांना हक्काचं विक्रीचा साधन उपलब्ध व्हाव यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दहा जिल्ह्यात दहा मॉल तयार करणार. टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात मॉल तयार करणार आहोत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर इंडिया ब्लॉकच्या एकतेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दिल्लीच्या निकालानंतर ममता बॅनर्जी यांनी असेही म्हटले आहे की ते २०२६ मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका एकट्या लढवतील.
शरद पवार यांची गुगली राजकारणात अनेकांना कळत नाही. पण माझे आणि शरद पवार यांचे प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढेही टाकणार नाहीत असे कौतुक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे.
महिला सक्षमीकरणाचा जागर करत राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये योगदान देत भक्कम पाया रचणाऱ्या महिलांचा उल्लेख करताना यामध्ये देशात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा विसर पर्यटन विभागाला पडला आहे.
मनोज्ञ जरांगे पाटलांना सपोर्ट करणारे आणि आंदोलनादरम्यान त्यांच्यासोबत असलेली वाहने वाळू माफियांची आहेत.
साहित्य संमेलनात राजकारण हा विषय नवीन नाही आणि त्याहीपेक्षा शरद पवार कुणाला तरी “टोपी” घालणार, हा देखील विषय नवीन नाही.
राज्याच्या पर्यावरण मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील भगवान गडाला भेट दिली. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, जोपर्यंत लोकांना मी हवी आहे, तोपर्यंत मी काम करत राहील. ज्यावेळेस लोक म्हणतील की आता आम्हाला तुमची गरज नाही त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेल. तसेच पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहे. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे.
नरेंद्र मोदी यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ हा संदेश इंडिया आघाडीला देखील दिला आहे. लोकसभेला आम्ही एकत्र लढलो, आघाडीतील प्रत्येक घटक एकमेकांसाठी काम करत होता. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, केरळ अशा सर्व राज्यात सर्वांनी एकमेकांना साथ दिली.
मुंबईत बऱ्याच दिवसांनी रंगल्या भेटीगाठी, झाले नाश्तापाणी तसेच दिल्लीत झाली डिनर डिप्लोमसी!! आजचा 10 फेब्रुवारी 2025 चा दिवस असा संमिश्र राजकीय घडामोडींचा ठरला.
अवैध वाळू उत्खनन, चोरटी वाहतूक, शासकीय कामात अडथळा, धमकीचे गुन्हा दाखल असलेल्या ९ जणांना चार जिल्ह्यांतून हद्दपार करण्याची कारवाई अंबडचे उपविभागीय अधिकारी पुलकित सिंह यांनी केली. त्यांना जालना, संभाजीनगर, बीड, परभणी जिल्ह्यांत प्रवेशास मनाई केली.
पंकजा मुंडे यांनी सोडून दिली स्वतंत्र पक्षाची पुडी; महाराष्ट्रातल्या राजकीय असंतुष्टांनी घेतली त्यामध्ये उडी!! असे चित्र महाराष्ट्रात दिसले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची राज ठाकरेंशी ही पहिलीच भेट आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या मेहुण्यावर जालना पोलिसांनी तडीपारची कारवाई केली आहे. जालना जिल्ह्यात 9 वाळू माफियांविरोधात पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. यात मनोज जरांगे यांचा मेहुणा देखील आहे. विलास खेडकर असे त्याचे नाव आहे. यावर बोलताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीका केली होती. आता यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या मूळ प्रतीमध्ये भारतातील देवदेवता आणि महापुरुषांची चित्रे होती. कालांतराने ती काढून टाकण्यात आली. आपल्या या दैवतांना घटनेत पुन्हा स्थान देण्यासाठी आवाज उठवण्याची गरज अाहे.
अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजां बाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वेदानुसार ब्राह्मण ठरतात, असे त्यांनी म्हटले आहे.
जनतेने नाकारलेल्या घराणेशाहीवरून एकमेकांची खेचाखेची राज ठाकरे आणि अजित पवारांच्या पक्षांच्या नेत्यांची रंगली जुगलबंदी!!
देवेंद्र फडणवीस सरकारने कायदेशीर कारवाई केली वाळू माफियांवर; पण मराठा आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली मनोज जरांगे यांनी आग पाखड केली देवेंद्र फडणवीसांवर!!
बीड जिल्हा आणि मराठवाड्यातले गुन्हेगारीचे बंड मोडण्यासाठी पोलीस प्रशासन ऍक्टिव्हेट झाले असून मनोज जरांगे यांचा सख्खा मेव्हणा वाळू माफिया विलास खेडकर याच्यासह नऊ जणांवर पोलिसांनी मराठवाड्यातून तडीपारचा बडगा उगारला आहे.
मुळशी तालुक्यात असलेल्या स्काय आय मानस लेक सिटीमध्ये पाकिस्तानी चलन सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली. ही सोसायटी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) च्या कॅम्पसपासून काही मीटर अंतरावर आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत अनियमितता झाली असल्याचा आरोप लोकसभेतील काँग्रेसची विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला. या आरोपाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.
राहुल गांधी यांनी 2029 ची निवडणूक कामठी विधानसभेतून लढवावी, असे आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार असून चितपट केल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही त्यांनी केला. पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते एका क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पार पडले
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले. मागील 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाला 22 जागांवर समाधान मानावे लागले. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील या यशामागे अमित शहा यांचे कष्ट आणि निवडणूक व्यवस्थापनाचेही मोठे योगदान असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्ली विधानसभेत अपेक्षित यश मिळाले नसले, तरी या निवडणुकीतून आम्हाला खूप शिकायला मिळाले, असेही ते म्हणाले.
राज्यपालांच्या दौऱ्यात पुरोहित संघाने गोदावरी आरती पुन्हा ओढली वादात, इतकेच नाही तर राज्यपालांच्या भाषणात आणि त्यानंतर राष्ट्रगीतामध्ये देखील पुरोहित संघाने आपल्या आरतीचा आवाज वाढवून अडथळा आणला. हा सगळा प्रकार राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या नाशिक दौऱ्यात घडला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App