आलिया भट्टची माजी वैयक्तिक सहाय्यक वेदिका प्रकाश हिला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. वेदिकावर आलियाची ७७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. वृत्तानुसार, वेदिकाने गेल्या २ वर्षांपासून अभिनेत्रीच्या वैयक्तिक आणि प्रॉडक्शन हाऊसच्या खात्यांमधून लाखो रुपये लुटले आहेत. वेदिका १० जुलैपर्यंत पोलिस कोठडीत राहील. तिचा शोध सुमारे ५ महिन्यांपासून सुरू होता. मुंबई पोलिसांनी तिला बंगळुरू येथून अटक केली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यांनी तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याची घोषणा केली असून, यामुळे सुमारे 50 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. 1 जानेवारी 2025 पर्यंत झालेले जमिनीचे तुकडे, आता कायदेशीर व्यवहारात आणता येणार आहेत.
शिक्षकांच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मोठे यश आले आहे. विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यात २० टक्के वाढीव पगार जमा होईल, असे आश्वासन सरकारने दिले आहे. आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनात जाऊन मंत्री गिरीश महाजन यांनी ही घोषणा केली. शिक्षकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. चर्चा सकारात्मक झाल्याचे महाजन यांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी सकाळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांशी भेट घेत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती.
आकाशवाणी आमदार निवासातील उपहारगृहातील अन्नाच्या निकृष्ट दर्जावरून उफाळलेला वाद आता गंभीर वळणावर पोहोचला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) उपहारगृहाचा परवाना निलंबित केला आहे.
शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, खते व कृषी निविष्ठा मिळाव्यात यासाठी कृषी विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येईल, यात कृषी विभागास तपासणीसाठी अधिकार देण्यासाठी आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.
अडीच वर्षात ज्यांनी शिक्षकांना फुटकी कवडी दिली नाही, ते शिक्षण संस्थांच्या अनुदानावर राजकारण करत आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आरसा दाखविला.
महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक २०२४ यावरील संयुक्त समितीचा अहवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी सभागृहात सादर केला. शहरी नक्षलवादाला आळा घालण्याच्या उद्देशाने मांडण्यात आलेल्या या विधेयकावर सखोल चर्चा आणि जनतेकडून मिळालेल्या सूचनांच्या आधारे महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून अशा दावा केला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन, मुंबई येथे महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची बैठक झा औषध खरेदी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि सुसूत्रीकरण आणल्यास औषधांचा तुटवडा भासणार नाही. वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने औषधे, साधनसामग्री आणि वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी एकाच ई-औषध संगणक प्रणालीचा वापर करावा. गुणवत्तेनुसार एकसमान दराने आणि विहित वेळेत औषध पुरवठा करण्यासह दोन वर्षांचा दरकरार निश्चित करावा. दरवर्षी 70% औषध खरेदी ही एकसमान होत असते. यासंदर्भात एक सामायिक योजना आखून त्याचा प्रस्ताव सादर करण्यात यावा.
मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता असून तिचा आदर सर्वांनी केला पाहिजे. मात्र काही राजकीय पक्ष केवळ निवडणूक जिंकण्यासाठी मराठी विरुद्ध हिंदी असा कृत्रिम वाद निर्माण करून जनतेच्या भावना भडकवत असल्याचा गंभीर आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला आहे.
शिक्षकांच्या आंदोलनात पवार + ठाकरेंची राजकीय घुसखोरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पुरती पोलखोल केली!!, असे आज विधान परिषदेत घडले.
राज्यात सध्या मराठी भाषा आणि हिंदी भाषिकांवरून सुरू असलेल्या राजकीय वादात आता समाजवादी पक्षाचे खासदार राजीव राय यांनी उडी घेतली आहे. “हिम्मत असेल तर बॉलिवूडला मुंबईबाहेर काढून दाखवा,” असे थेट खुले आव्हान त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले आहे.
शिक्षकांच्या आंदोलनात शरद पवारांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे पोहोचले; राजकीय श्रेय घेण्यात वाटेकरी झाले!!
ठाकरे बंधूंच्या राजकीय ऐक्यामुळे राजकीयदृष्ट्या अस्वस्थ झालेल्या शरद पवारांना शिक्षकांच्या मागण्यांची राजकीय संधी मिळाली. त्यामुळे त्यांनी मुलगी आणि नातवासह शिक्षकांच्या आंदोलनात उडी घेतली.
अहिल्यानगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाटा शिवारात आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची धडक बसून, दुचाकीवरील हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला. सोमवारी (७ जुलै) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. नितीन प्रकाश शेळके (३४, रा. पळवे खुर्द, ता. पारनेर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी सुपे पोलिस ठाण्यात आमदार धस यांचा मुलगा सागर धसविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईत सध्या मराठी-अमराठी वाद सुरू असून, याबाबत मनसेने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. मराठीच्या मुद्द्यावरून वाद सुरू असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रसारमाध्यमांशी न बोलण्याचे आणि कोणतीही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त न करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तसेच प्रवक्त्यांनी पक्षाची बाजू मांडण्यापूर्वी माझी परवानगी घ्यावी, असेही राज ठाकरे यांनी आदेशात म्हटले आहे.
भारतीय संविधान हे रक्तहीन क्रांती निर्माण करण्याचे साधन असल्याचे मत भारताचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी मंगळवारी विधिमंडळात बोलताना व्यक्त केले. हे विधान करताना त्यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला दिला. भारताची राज्यघटना ही देशात एक रक्तहीन क्रांती निर्माण करण्याचे साधन आहे असे बाबासाहेब म्हणायचे. निश्चितच आपण मागील 75 वर्षांच्या कालखंडात याच दृष्टिकोनातून काम केले आहे, असे ते म्हणाले.
धर्मांतर केलेल्या हिंदुंना आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. यासंबंधी न्यायालयानेच निकाल दिला असून, आपल्या भागातील अशा धर्मांतरितांना शोधून त्यांच्या नोकऱ्या काढून घ्या
महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाची जागा अद्यापही रिकामीच असल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार आक्रमक भूमिका घेतली आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या विधानसभेतील स्वागत सोहळ्याच्या दिवशीच विरोधकांनी लोकशाहीच्या मूल्यांचा आणि परंपरेचा मुद्दा उपस्थित करत सभागृहात गोंधळ घातला. त्यांनी हे प्रकरण केवळ राजकीयच नव्हे तर लोकशाहीच्या प्रतिष्ठेशी निगडित असल्याचा आरोप करत कामकाजावर बहिष्कार टाकला.
निशिकांत दुबे यांनी दिली उद्धव ठाकरेंच्या भ्रष्टाचाराची यादी, पण त्यामुळेच “नॅचरल करप्ट पार्टीच्या” सोबतीची कुणी यायची जबाबदारी??, असा सवाल तयार झाला.भाजपचे बडबोले खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी लोकांविरुद्ध बोलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणले. ठाकरे बंधूंना ठोकता ठोकता निशिकांत दुबे मराठी लोकांवर घसरले. बाहेरच्यांच्या टॅक्स वर मराठी लोक जगतात, असे बोलून बसले. शेवटी देवेंद्र फडणवीस यांना त्या संदर्भात खुलासा करावा लागला. निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यापासून महाराष्ट्र भाजपला अंतर राखावे लागले. पण जे काही झाले ते “पॉलिटिकली कॅल्क्युलेटेड” झाले असेच बोलले गेले. कारण त्यातून मराठी – अमराठी मतांचे ध्रुवीकरण समोर आले.
दारूच्या नशेत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेच्या गाडीला धडक देणे, अपमानास्पद भाषा वापरणे आणि धमकी देणे, अशा गंभीर प्रकारात अडकलेल्या राहील खान या याच्यापासून मनसेने स्पष्टपणे अंतर ठेवले आहे. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी यासंदर्भात परिपत्रक काढून सांगितले की, राहील हा मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष जावेद शेख यांचा मुलगा असला तरी, त्याच्या वर्तनाशी पक्षाचा कोणताही संबंध नाही. त्याच्या वर्तनाचे समर्थन मनसे करत नसून, पोलिसांनी त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
विधानसभेत विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी संख्याबळ तोकडे, म्हणून महाविकास आघाडीचे नेते सरन्यायाधीशांकडे धावले!!, असे आज विधिमंडळात घडले.
ठाकरे बंधूंनी गाजवला मराठीचा मुद्दा, पण पवारांच्या हाती लढायला मुद्दाच लागेना!!, अशी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था होऊन बसली
रायगड मध्ये शरद पवारांची भाषा पुरोगामी, पण त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फरफट ठाकरे बंधूंच्या पक्षांच्या दारी!!, अशी अवस्था झाल्याचे समोर आलेय.
राज्याच्या अर्थसंकल्पीय व्यवहारांवर आणि निधीच्या वितरणावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते व आमदार भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर विधानसभेत कडक शब्दांत टीका केली. “कोणाला किती निधी द्यायचा, हे अर्थमंत्री कसे ठरवू शकतात?” असा थेट सवाल करत त्यांनी अर्थविभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मराठी – अमराठी वादात मराठी बोलणार नाही अशी मुजोरी करणाऱ्या व्यापाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी फटकावल्यानंतर व्यापाऱ्यांनी मीरा-भाईंदर मध्ये मोठा मोर्चा काढला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App