उद्धव आणि राज हे दोन भाऊ एकत्र येण्याबद्दल आम्ही आशावादी आहोत. मात्र दोन भाऊ व दोन्ही पक्ष हे एकत्र येणार नाही यासाठी भाजपा प्रयत्न करीत आहे, असा आरोप उबाठा नेते भास्कर जाधव यांनी येथे माध्यमांशी बोलताना केला. घराघरात भांडणे लावून राजकीय स्वार्थ कसा साधता येईल याचा विचार भाजप करीत आहे. राज व उद्धव ठाकरे एकत्र आले तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ५४ टक्के मते या दोन भावांना मिळतील, असा सर्व्हे आहे, त्यामुळे भाजप घाबरलेला आहे, असे जाधव यांनी सांगितले.
येथे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एक धक्कादायक आरोप करत पोलिस प्रशासन आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, “माझ्यावर दाखल झालेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा हा केवळ राजकीय दबावामुळे दाखल करण्यात आला आहे.” यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हे प्रकरण उच्च न्यायालयात नेण्याचा इशारा दिला.
“आज पैसा नाही तर माणूस हेच खरे भांडवल आहे. उद्योगधंदे तिथेच जातात जिथे प्रशिक्षित कामगार, संशोधन आणि नवकल्पना असतात. त्यामुळे गुणवत्तापूर्ण आणि बहुविध कौशल्य असलेली कार्यबल तयार करणे अत्यावश्यक आहे. यामुळे मानव संसाधन विकास हीच खरी गुंतवणूक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज(शनिवार) मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रात कॅम्पस स्थापन करण्यासाठी 5 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना ‘लेटर ऑफ इंटेंट’ (LOIs) प्रदान केले. हा कार्यक्रम ‘मुंबई रायझिंग – क्रिएटिंग अॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’ अभियानांतर्गत आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदाबाद-लंडन विमान अपघातसारख्या कठीण प्रसंगी भारताच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल जागतिक समुदायाचे आभार मानले.
अहमदाबाद येथील भीषण विमान अपघातामागे सायबर हल्ला असू शकतो, अशी गंभीर शंका शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवारांची कॉपी हाणली, पण निदान ती कॉपी करण्याची वडेट्टीवार यांची कारणे तरी मोठी निघाली.
पुण्यात मुसळधार पावसामुळे आणि सध्याच्या आरोग्यविषयक आव्हानांमुळे जनतेला सावध राहण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. शुक्रवारी रात्री पावसामुळे पुणे शहरातील अनेक भागांमध्ये, विशेषतः हिंजवडीमध्ये पाणी साचले होते, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) NCP SP अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाजप सोडून इतर पक्षांशी युती करायची तयारी केली, त्याबरोबर पवारांच्या आमदारांच्या मनात वेगळीच भीती रुतून बसली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्यास पक्ष सकारात्मक असल्याचे पक्षातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही पर्याय असणार आहे. यामुळे काका-पुतणे एकत्र येणार का? याची चर्चा सुरू आहे.
अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. या विमानाला जगभरात बंदी असताना भारतात डीजीसीएने आधीच कारवाई का केली नाही? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. इतकेच नाही तर कोणत्याही दबावाला बळी न पडता आता तरी तात्काळ या विमानांची सेवा खंडित करून देण्यात आलेल्या ऑर्डर रद्द करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांना सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपले. या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. काही ठिकाणी तर वाहने अक्षरशः पाण्यात वाहून गेल्याचे पाहायला मिळाले. दिवे घाटात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने रस्त्यांना ओढ्यांचे स्वरूप आले, तर पुण्याच्या आयबी गेस्ट हाऊसमध्येही पाणी शिरले होते.
नागपुरात सुमारे ८ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. पुढील वर्षी २०२६ पर्यंत कारखाना सुरु होण्याची शक्यता आहे. ८ हजार कोटींची ही गुंतवणूक येत्या आठ वर्षात टप्प्प्याटप्याने होणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागात नागपूरमध्ये हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून सुटली “नवी राजकीय पुडी”; भाजपचे मित्र पक्ष फोडायला शिंदे आणि अजितदादांच्या हातात घालणार युतीची नवी बेडी!!, असला प्रकार शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून आता समोर आलाय
महाराष्ट्रात बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या परदेशी नागरिकांची संकलित केलेली माहिती सरकार लवकरच सर्वांसमोर ठेवणार आहे. अशा लोकांना शोधण्याची आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू असल्याने, सरकार जाणूनबुजून ही माहिती सार्वजनिक करत नाही, अशी महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
गुजरातमधील अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भाचेसून अपर्णा महाडिक यांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड अजोड आहे. त्याला कुणी मोडू शकत नाही, अशी भाषा मध्यंतरी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वापरली होती.
बड्या नेत्यांच्या उलट्यापाट्या भेटीगाठी, एकमेकांची खेचाखेची; पण कार्यकर्त्यांच्या मात्र ओढाताणी!! असला प्रकार महाराष्ट्रात सुरू झालाय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस 14 जून रोजी आहे. वाढदिवशी भेटणार नाही. मात्र कोणतेही अर्थ काढू नका, असे आवाहन त्यांनी पत्र लिहून मनसैनिकांना केले आहे. या पत्रात त्यांनी मनसैनिकांना शिवतीर्थावर येऊ नये असे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो. मी नितेशला समज दिली आहे, असे भाजप खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे. भाजप आमदार व मंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी धाराशिव येथे बोलताना महायुतीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावरून महायुतीमध्ये अंतर्गत वाद पेटला होता. त्यानंतर नीलेश राणे यांनी देखील ट्विट करत नितेश राणे यांना विधाने जपून करावीत असा सल्ला दिला होता. आता नारायण राणे यांनी देखील समज दिल्याचे समजते.
मराठा समाजासाठी दिलेलं SEBC (Socially and Educationally Backward Class) आरक्षण सध्या लागू आहे आणि त्यावर कोणतीही स्थगिती (stay) दिलेली नाही. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणावर बुधवारी विशेष खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानुसार उच्च न्यायालयाने सर्व याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी सुरू केली आहे. या सुनावणीमुळे मराठा विद्यार्थ्यांना सध्या शैक्षणिक प्रवेशासाठी SEBC आरक्षणाचा लाभ मिळत राहणार आहे.
माजीमंत्री विक्रम सिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजित सिंह पाटणकर यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात सामील होण्याचे कारण सांगितले आहे. सत्यजित पाटणकर म्हणाले की, पाटण विधानसभा मतदारसंघातील रखडलेले प्रकल्प भाजप सरकारमार्फत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.
भाजपसाेबत जाण्याचा निर्णय दाेन ते तीन वेळा अंतिम झाला हाेता. मात्र नंतर भूमिका बदलण्यात आली असा गाैप्यस्फाेट करत राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाला महापालिका निवडणुकीसाठी प्रक्रिया करण्याचे आदेश दिल्यानंतर नगर विकास विभागाने मंगळवारी रात्री राज्यामधील अ, ब आणि क या वर्गवारी मधील नऊ आणि ड वर्गातील 19 महापालिकेंच्या निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहे. मुंबई वगळता राज्यात इतरत्र चारचा प्रभाग होणार आहे.
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले असून, ती २०११ च्या जनगणनेच्या आधारावर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात २०१७ मध्ये अस्तित्वात असलेल्या प्रभाग रचनेनुसारच नव्याने काही किरकोळ बदल करून ती रचना पुन्हा लागू होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही प्रक्रिया सुरु केली असून, या प्रभाग रचनेवर आधारित निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा करत मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. त्यांनी जाहीर केलं की, मुंबईतील सर्व लोकल ट्रेन लवकरच एसी (AC) केल्या जातील आणि त्यासाठी प्रवाशांकडून कोणतीही भाडेवाढ केली जाणार नाही.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App