माळेगावची निवडणूक शरद पवारांनीच अजितदादांना जिंकून दिल्याची माध्यमांची टिमकी; प्रत्यक्षात पवारांची ताकद मते फोडण्यापुरतीच उरली!! हे माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीने सिद्ध केले.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांनी चंद्रराव तावरे यांना वयावरुन हिणवत निकालात काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तावरे हे एकटे निवडून आले.
आता अदानी कंपनीचा सीएनजी रिलायन्सच्या इंधन पंपांवर विकला जाईल. रिलायन्स बीपी मोबिलिटी आणि अदानी टोटल गॅसने यासाठी भागीदारी केली आहे. सध्या, अदानीचा सीएनजी काही जिओ पेट्रोल पंपांवर उपलब्ध असेल.
मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आहे आणि संघ काही भाजपमध्येच राहून काम करा असे सांगत नाही. त्यामुळे मी संघातही आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून समाजसेवा करतो आहे. माझी मते आधीही आणीबाणीच्या विरोधात होती आणि आताही विरोधातच आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले.
शातील सर्वात मोठ्या संरक्षण कॉरिडॉरची उभारणी नाशिकमध्ये होत आहे. छत्रपती संभाजीनगर त्या कॉरिडॉरचा भाग असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (२५ जून) केली. एकेकाळी केवळ धार्मिक आणि कृषी केंद्र म्हणून ओळखले जाणारे नाशिक आता संरक्षण उत्पादन क्षेत्रातील ‘न्यू मॅग्नेट’ बनणार आहे.
महाराष्ट्रातील जनतेसाठी एक दिलासादायक बातमी आहे. फडणवीस सरकारने वीज दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की पहिल्या वर्षी १० टक्के कपात केली जाईल
19500 पेक्षा जास्त मतदार असलेल्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांचे पॅनल जिंकले. चंद्रराव तावरे यांचे पॅनल हरले.
शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीच्या इतिहासात बारामतीकरांनी आतापर्यंत त्यांना कधीच निराश केले नव्हते. “शरद पवार बोले आणि बारामती डोले” अशी स्थिती तब्बल 55 वर्ष कायम होती.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील श्री चिन्मयमूर्ती संस्थानचे मठाधिपती माधवानंद महाराज गुरु वामनानंद स्वामी यांनी श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाऊन, २२ जून रोजी एकदशीच्या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी १७ लाख ६८ हजार किंमतीचा सुवर्ण तुळशीहार अर्पण केला.
अजित पवारांच्या खात्याकडे मोठा निधी आहे, त्यावर लक्ष ठेवा. तो निधी कुठे वितरित होतो याची माहिती घ्या, असा आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिला असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची वेगळी बैठक घेतली. यात निधी वाटपावरून शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती आहे.
राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्या या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीसह प्रत्युत्तर दिले आहे. इतकेच नाही तर राहुल गांधी यांच्या अपमानास्पद पराभवाचे दुःख वाढले असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. ते अजून किती काळ हवेत बाण सोडत राहणार? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
राहुल गांधींच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी विरोधी पक्षाच्या काही विजयी आमदारांच्या मतदारसंघाचे दाखले देत मोठा डाव टाकला
नाशिक मध्ये भरलेल्या डाव्या पक्षांच्या संमेलनामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी डाव्या पक्षांच्या एका चुकीमुळे भाजपचा विस्तार झाला, असा “जावईशोध” लावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा सूत्रासंदर्भात आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी आढावा बैठक संपन्न झा
त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. त्रिभाषा सूत्रासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी एक बैठक आज रात्री पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि शिक्षण विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत काकांनी साधला डाव, मुलगी ठेवून safe अजितदादांच्याच पुतण्याला धोबीपछाड!! असे राजकारण शरद पवारांनी खेळले.
महाराष्ट्रात बच्चू कडूंनी उपोषण आंदोलन केल्यानंतर सगळ्या विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीचा धोषा लावला.
राज्यात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे अखेर गती मिळू लागली आहे. महानगरपालिका, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आवश्यक असलेल्या प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ऑक्टोबर 2025 मध्ये ही रचना अंतिम केली जाणार आहे. त्यानंतरच महापालिका व नगरपालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्र २०२४ विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ वाजल्यानंतर अचानक रहस्यमय पद्धतीने वाढलेल्या ७६ लाख मतांबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी आज पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे चेतन चंद्रकांत अहिरे यांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चेतन अहिरे विरुद्ध भारतीय संघराज्य व इतर या प्रकरणात आज सुनावणी झाली. यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर २५ जून रोजी निकाल जाहीर केला जाईल, असे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राजकीय आणि सामाजिक आंदोलनांशी संबंधित प्रलंबित गुन्ह्यातील आरोपपत्र दाखल केलेले सर्व खटले मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. गृह विभागाने यासंदर्भातील शासकीय निर्णय (जीआर) 20 जून रोजी जारी केला आहे.
नीट’ परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने शिक्षक असलेल्या बापाने पोटच्या मुलीला लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत या 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेने सांगलीच्या आटपाडी गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी वडिलांना पोलिसांनी अटक केली असून मुलीच्या आईने फिर्याद दिली होती.
पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने मागे घेतला. त्याऐवजी सुधारित आदेश काढला तरी देखील महाराष्ट्र शासनाने हिंदी भाषेची सक्ती विद्यार्थ्यांवर लादल्याचा आरोप करून मराठी कवी हेमंत दिवटे यांनी पुरस्कार वापसीची घोषणा केली.
एकेकाळी बेरजेच्या राजकारणाचा वैचारिक मुलामा देऊन यशवंतराव चव्हाण यांना विरोधी पक्षांना फोडावे लागले होते, पण आता 2025 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाने एवढे मोठे वळण घेतले आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे ‘त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे 2027 मध्ये होणाऱ्या ‘सिंहस्थ कुंभमेळा’च्या निमित्ताने रस्ते विकासासंदर्भात बैठक संपन्न झाली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या 100 हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात भाजप जाहीर प्रवेश केला. मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आमदार प्रविण दरेकर आणि मुंबई भाजपचे उपाध्यक्ष कमलाकर दळवी देखील उपस्थित होते.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App