राज्याच्या राजकारणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या उलथापालथी सुरू असून, अनेक बडे नेते आता पक्षांतराच्या मार्गाने आपली पुढची वाट धरत आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिक आणि इंदापूर येथील राष्ट्रवादीच्या नेत्यांसह राजू शेट्टीचे सहकाऱ्याने कमळ हाती घेतले. नाशिकचे माजी शिक्षक आमदार अपूर्व हिरे, इंदापूरचे प्रवीण माने आणि राजू शेट्टी यांचे जवळचे सहकारी आणि शेतकरी नेते सावकार मादनाईक यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्ज माफीचा मुद्दा चांगलाच गाजला. या प्रश्नावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील नेते विजय वडेट्टीवार यांनी या विषयावर स्थगन प्रस्ताव मांडला. मात्र, अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. इतकेच नाही तर विरोधक शेतकऱ्यांच्या आडून राजकारण करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.
हिंदी सक्तीला विरोध आणि मराठीचे प्रेम उफाळले, या दोन मुद्द्यांवर फडणवीस सरकार आणि ठाकरे बंधू यांच्या धुमश्चक्रीत काँग्रेस पडली बाजूला, पवारांच्या राष्ट्रवादीलाही कुणी विचारेना!!, अशी अवस्था दोन्ही पक्षांची झाली.
हे काय दादा कोंडकेंचे उत्तर आहे का? हे द्वीअर्थी आहे का? असा सवाल करत माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार भर सभागृहात मंत्री संजय राठोड यांच्यावर भडकले भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारसंघातील नाला रुंदीकरणाच्या मुद्यावरून विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तर दिले नाही म्हणून जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना चांगलेच सुनावले. मुनंगटीवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे नाराजी व्यक्त केली. यावर अध्यक्षांनी देखील मंत्री राठोड यांना अपेक्षित उत्तर देण्यास सांगितले.
भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या रुपाने पक्षाचा तळागाळातील हाडाचा कार्यकर्ता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झाला आहे. भाजपा ही कार्यकर्त्यांची पार्टी असून सामान्य कार्यकर्ता पक्षाचा अध्यक्ष होऊ शकतो, हे केवळ भाजपामध्येच शक्य आहे,असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
महाराष्ट्रातला हिंदी सक्तीचा मुद्दा तापल्यानंतर अनेकांना मराठी प्रेमाचे उमाळे आले. त्यामध्ये अनेक मराठी साहित्यिक देखील शिरले. त्यांनी फडणवीस सरकार विरुद्ध तोंड शेकून घेतले. मधल्या मध्ये शिवसेना आणि मनसे यांचे मनोमिलन झाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका संयुक्त पत्रकाद्वारे मराठी जनतेला 5 जुलैच्या विजयी मेळाव्याला वाजत – गाजत येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे हे दोन्ही भाऊ या मेळाव्याच्या निमित्ताने एका व्यासपीठावर येणार हे स्पष्ट झाले आहे. विशेषतः ठाकरे बंधू केव्हा एकत्र येणार? हा अवघ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्नही या निमित्ताने निकाली निघाला आहे.
पावसाळी अधिवेशनात विधानसभेच्या कामकाजात मंगळवारी गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. काँग्रेस नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष सुधा नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत थेट अध्यक्षाच्या आसनापर्यंत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माफीची मागणी केली. त्यांच्या या कृतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका करत चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंनी असा प्रयत्न केला का? असा सवाल उपस्थित केला.
भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी जालना जिल्ह्यात केलेल्या वक्तव्य प्रकरणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सभागृहात मांडला. या प्रकरणात लोणीकर, कृषिमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यासाठी त्यांनी थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आसनाजवळ जात राजदंडला देखील स्पर्श केला. त्यामुळे अध्यक्षांनी त्यांनी एका दिवसासाठी निलंबित केले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रोज निलंबित केले तरी सभागृहात आवाज उचलणार असल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस हे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.
हजारो मैल पायपीट, पाऊस-ऊन-वारा अंगावर झेलत आणि मुखी ज्ञानोबा-तुकारामाचा गजर करत हजारो वारकरी दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघतात. वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी यंदा महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वारीदरम्यान एखाद्या अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना सरकारकडून चार लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. यासंदर्भातले नवे परिपत्रक महसूल विभागाने मंगळवारी जारी केले आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी आज बिनविरोध निवड करण्यात आली. पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ही घोषणा झाली
कटू इतिहास विसरून ठाकरे बंधू एकत्र, पण भाजप मधले जुने शिवसैनिक अस्वस्थ!!, अशी महाराष्ट्राच्या राजकारणाची आता अवस्था झालीय.
बैलगाडीच्या शर्यतीत जसे बक्षीस ठेवले जाते, तसेच बक्षीस धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरी लोकांना ठोकण्यासाठी ठेवले पाहिजे, असे वादग्रस्त विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविरोधात केले आहे. त्यांच्या या विधानामुळे ख्रिश्चन धर्मियांत मोठा रोष निर्माण झाला आहे. या प्रकरणी ख्रिश्चन धर्मियानी सोमवारी जालन्यात आक्रोश मोर्चा काढला.
मराठी भाषेबाबत आम्ही कधीही तडजोड करणार नाही, मराठी माणसाच्या हक्कांवर गदा आली तर ती सहन केली जाणार नाही, असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मुंबईत पार पडलेल्या शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षातील मंत्र्यांना आणि आमदारांना देखील कानपिचक्या दिल्या. विरोधकांना एक्स्पोज करताना स्वतः एक्स्पोज होऊ नका, असे एकनाथ शिंदे मंत्र्यांना म्हणाले.
मावळ तालुक्याचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे सोमवार 30 जून रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री 9 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबद्दल सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात असून, मावळ तालुक्यात शोककळा पसरली आहे.
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकारची चौफेर कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सरकार कुणाच्याही दबावापुढे झुकणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. सरकारने हिंदीच्या मुद्यावर एक समिती स्थापन केली आहे. ही समितीच आता योग्य तो निर्णय घेईल. सरकार केवळ कोणत्याही पक्षाचे हित पाहणार नाही, केवळ महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे लक्ष पाहील. आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही, असे ते म्हणालेत. ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन क्रिकेट खेळावे, स्वीमिंग करावी आम्हाला काही अडचण नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी ठाकरे बंधूंना हाणला.
त्रिभाषा सक्तीविरोधात शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांनी ५ जुलै रोजी विजयी निर्णय घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे.
राज्य सरकारने हिंदी सक्तीचे शासन निर्णय रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर 5 जुलै रोजी नियोजित ठाकरे गट आणि मनसेचा मोर्चा ‘विजयी मेळावा’ म्हणून साजरा केला जाणार आहे. मात्र, या विजयी मोर्चावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका करत हा उत्सव म्हणजे “शैक्षणिक हत्येचे तांडव” असल्याचे म्हटले आहे. त्यांनी मनसेवर “विद्यार्थ्यांची हत्या करणारी सेना” अशी कठोर टीका केली असून, राज आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण गल्लीपुरते व दळभद्री आहे, असेही म्हटले.
२०२६ – २७ मध्ये होणारा नाशिक आणि त्रंबकेश्वरचा सिंहस्थ कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने एक ऐतिहासिक, सांस्कृतिक उपक्रम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प केला असून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी गोदावरी महात्म्याचे दस्तावेजीकरण करण्यात येणार आहे.
२०२६ – २७ मध्ये होणारा नाशिक आणि त्रंबकेश्वरचा सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी शासकीय स्तरावरून होणाऱ्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने विविध उपक्रम सुरू करायचे ठरविले असून सिंहस्थ कुंभमेळा पर्यावरण पूरक आणि हरित व्हावा यासाठी सेवा समितीने पुढाकार घेतला आहे.
महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, निवडणुकीपूर्वीच मुंबई काँग्रेसमधील वाद खूप वाढला आहे. मुंबई काँग्रेसमधील वरिष्ठ नेते मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या विरोधात एकवटले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शनिवारी मुंबई काँग्रेसने एक समिती स्थापन केली. मुंबई काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना या समितीत स्थान मिळाले नाही, त्यामुळे पक्षाचे काही वरिष्ठ नेते संतप्त झाले आहेत.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा रणशिंग फुंकले असून, मुंबईत मंत्रालयावर थेट धडक देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 27 ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून या आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. दोन दिवसांत मुंबई गाठून 29 ऑगस्ट रोजी तेथे शांततेत आंदोलन होणार आहे. रविवारी आंतरवालीत पार पडलेल्या मराठा समाजाच्या बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी आंदोलनाची घोषणा केली.
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय महायुतीसरकारने रद्द केले आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार देखील उपस्थित होते. आता यावरून विरोधकांनी प्रतिक्रिया देणे सुरू केले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली, असे म्हटले आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारने पत्रकार परिषद घेत हिंदी भाषेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
हिंदी भाषा वाद हा सध्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा मुद्दा बनली आहे. विशेषतः विरोधी पक्ष सतत मराठी भाषेला प्रोत्साहन देण्याबद्दल बोलत आहेत, तर सरकारवर मुलांवर हिंदी लादल्याचा आरोप करत ते त्यावर बहिष्कार घालत आहेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App