पुण्याच्या विकासात दादागिरी घुसलीय. आमच्याच लोकांना कंत्राटे द्या. आमच्याच लोकांना कामावर ठेवा. आम्ही सांगू त्याच पद्धतीने काम करा हा माईंडसेट बदलावा लागेल
३००० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष आणि एमडी अनिल अंबानी यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) लूकआउट नोटीस जारी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनिल अंबानी यांना तपास अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय भारताबाहेर जाण्याची परवानगी नाही. जर त्यांनी परदेशात प्रवास करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना विमानतळ किंवा बंदरांवर ताब्यात घेतले जाऊ शकते.
पुण्यातील यवत गावात एका आक्षेपार्ह पोस्टवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले होते. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बाबत दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
पुण्याच्या दौंड तालुक्यातील यवत येथे दोन गटांत जातीय तणाव निर्माण झाला आहे. व्हॉट्सॲपवरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे हा वाद भडकला. त्यात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन स्थितीवर नियंत्रण मिळवले. सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून या घटनेची मा
पावन गोदावरी तीर्थावर रामतीर्थ गोदावरी सेवा समिती, नाशिक यांच्या वतीने आयोजित गोदावरी आरती आणि समरसता संध्या हा विशेष सोहळा उत्सवी आणि भावपूर्ण वातावरणात अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाला.
श्यामची आई 71 वर्षानंतरही दिल्लीत सुपरहिट राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत पुन्हा फिट!!, असे आज घडले. साने गुरुजींच्या श्यामच्या आईने 71 वर्षांपूर्वी 1954 मध्ये राष्ट्रपतींचे सुवर्ण कमळ पटकावले होते
पुणे येथील कथित रेव्ह पार्टी प्रकरणी माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह इतर सहा जणांना देखील ताब्यात घेतले असून यात दोन महिलांचा समावेश आहे. आज या प्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडली असून पोलिसांनी खेवलकर यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी न्यायालयाने प्रांजल खेवलकर यांच्यासह चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे प्रांजल खेवलकर यांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देव शिक्षा देईल, अशा शब्दात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी न्यायालयाचा निकाल आल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना न्यायालयातच रडू कोसळले होते. मी संन्यासी आयुष्य जगले तरी देखील माझी बदनामी केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. माझ्या वरून भगव्या रंगाची बदनामी करण्यात आली. मात्र आज त्याच भगव्या रंगाचा विजय झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मिठी नदी घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी मुंबईतील सुमारे आठ ठिकाणी छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. मिठी नदीतून काढलेल्या गाळाचे डंपिंग आणि विल्हेवाट लावण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेला बनावट सामंजस्य करार सादर केल्याचा आरोप असलेल्या कंत्राटदारांशी संबंधित असलेल्या जागांवर हे छापे टाकण्यात आले आहेत.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह इतर आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यानंतर 65 किलो आरडीएक्स आले कुठून हा प्रश्न अनुत्तरित आहे. आतंकवादाला जात, धर्म, रंग, पंथ नसतो. तसेच आतंकवादाला धर्माचे नाव चिकटवणे योग्य नाही हे आधीपासून आम्ही सांगत आहोत, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
विशेष एनआयए कोर्टाने मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी दिलेल्या निर्णयामुळे काँग्रेस प्रणित तत्कालीन यूपीए सरकारच्या षडयंत्राचा पर्दाफाश केला, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी या निकालावर भाष्य करताना केला. काँग्रेस व यूपीए सरकारने एक षडयंत्र रचून हिंदू व भगवा दहशतवादाचा खोटा प्रचार केला. या प्रकरणी त्यांनी संपूर्ण हिंदू समाजाला दहशतवादी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी जाहीर माफी मागितली पाहिजे, असे ते म्हणाले.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासह सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात ७ मुख्य आरोपींमध्ये भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी आणि सुधाकर धर द्विवेदी यांचा समावेश होता.
विधानसभेत अधिवेशनादरम्यान रमी (पत्ते) खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वादात अडकलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अखेर कारवाई झाली आहे.
श्रावणमासाच्या पावन संध्याकाळी गोदावरी सेवा समिती, नाशिक यांच्या वतीने उद्या १ ऑगस्ट २०२५, शुक्रवार, सायंकाळी ६ वाजता रामकुंड गोदावरी तीरावर गोदावरी महाआरती संपन्न होणार आहे.
बीड जिल्हा कारागृहात एक स्पेशल फोन सापडला आहे. हा फोन आका अर्थात वाल्मीक कराड वापरत होता. या फोनचे कॉल डिटेल्स काढले तर सर्वकाही काळेबेरे बाहेर येईल, असा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला.
हिंदू दहशतवादाचा narrative NIA न्यायालयात उद्ध्वस्त; मालेगाव बॉम्बस्फोटातले आरोपी निर्दोष मुक्त!!, असे आज घडले. सोनिया गांधींच्या काँग्रेस प्रणित सरकारने लादलेली आणलेली हिंदू दहशतवादाची संकल्पना न्यायालयाने मोडून काढली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या मतदार यादीवर आता काँग्रेस पक्षाचा वतीने वॉच ठेवण्यात आले आहे. त्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगावर केलेल्या आरोप संदर्भातले पुरावे शोधले जाणार आहेत.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या संदर्भात आगामी 20 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालय अंतिम निकाल देण्याची अपेक्षा होती. मात्र, आता या प्रकरणाचा निकाल पुन्हा एकदा लांबीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वास्तविक या प्रकरणाचा निकाल देणारे न्यायमूर्ती सूर्यकांत हे आता सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या घटना पीठामध्ये असल्यामुळे शिवसेना चिन्ह बाबतीत असलेल्या प्रकरणाचा निर्णय आणखी पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेस पक्षाच्या खासदार प्रणिती शिंदे ऑपरेशन सिंदूरला सरकारचा तमाशा असे संबोधले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणजे हा सेनेचा अपमान करण्यासारखे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. असे विधान करणाऱ्यांचा मी निषेध करतो. या प्रवृत्तीचा मी धिक्कार करतो, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी प्रणिती शिंदेंवर केला.
ऑपरेशन सिंदूरवर लाेकसभेत झालेल्या चर्चेत काॅंग्रेसच्या साेलापूर लाेकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी तमाशा हा शब्द वापरला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणं म्हणजे जे 26 भारतीय मारले गेले त्यांचा, सैन्याचा अपमान करण्यासारखे असल्याची टीका त्यांनी केली आहे.
नाशिक शहर आणि विशेषतः रामतीर्थ, पंचवटी परिसराच्या विकासात पुरोहित संघाचे योगदान मोलाचे असून या संघाला विश्वासात घेऊनच कुंभमेळ्याचे नियोजन केले जाईल, असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी केले.
वाल्मीक कराड प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. बीड जिल्हा कारागृहात एक स्पेशल फोन सापडला आहे. हा फोन आका अर्थात वाल्मीक कराड वापरत होता. या फोनचे कॉल डिटेल्स काढले तर सर्व काही काळेबेरे बाहेर येईल, असा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला.
सोशल मीडियाचा वापर सर्वत्रच मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यावर लोक आपले खासगी आयुष्यातील क्षण तसेच फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. परंतु, आता महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापरासाठी काही नियमावली व महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने (GAD) नुकतेच हे दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यामुळे कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला सरकारवर टीका करणे किंवा धोरणांबद्दल नकारात्मक टिप्पणी करणे महागात पडणार आहे.
मंत्रिमंडळातल्या चार चुकार मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झापले की नाही??, याच्यावर मराठी माध्यमांनी बराच खल केला. विरोधी पक्षांनी टीका टिप्पण्या केल्या पण स्वतः फडणवीसांनी मात्र मंत्रिमंडळात जे बोललो, ते बाहेर सांगणार नाही
शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, ऑपरेशन सिंदूर हे एक यशस्वी मोहीम होती. यात दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत. आपल्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. राजनाथ सिंह हे एक आदरणीय संरक्षण मंत्री आहेत. ते देशाला काय घडले याची माहिती देऊ शकले असते. प्रत्येक प्रश्न विरोधी पक्षाकडून येत नसतो. काही प्रश्नांची उत्तरे देणे ही त्यांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. देशातील जनतेच्या मनातील प्रश्न विरोधी पक्षाने उपस्थित केले आहेत. याचे मी स्वागत करते. सत्ताधारी पक्ष त्यांचे उत्तर देईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आज चर्चा होईल, मला आशा आहे की पंतप्रधान दोन्ही सभागृहांना उपस्थित राहतील, असेही त्या म्हणाल्या.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App