आपला महाराष्ट्र

Disha initiative

Disha initiative : ‘दिशा’ उपक्रमाच्या माध्यमातून अल्पवयीन गुन्हेगारांचे पुनर्वसन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अलीकडच्या घटनांमध्ये 9 गुन्हे नोंद झाले असून, त्यामध्ये 19 आरोपींपैकी 13 आरोपी हे विधि संघर्षित बालक आहेत.

Maharashtra

Maharashtra : औष्णिक केंद्रातील राखेच्या वितरणासाठी महाराष्ट्राचे आता नवे धोरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात औष्णिक केंद्रातील राखेच्या विक्रीसंदर्भात नव्या सर्वंकष धोरणाची घोषणा केली. केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार सध्या 100 टक्के लिलावाची अंमलबजावणी होत असली तरी स्थानिक उद्योगांना प्राधान्य देऊन त्यांचावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

महाराष्ट्रात 25 लाख उद्योजिका लखपती दीदी बनविण्यात बिल गेट्स फाउंडेशन उचलणार वाटा; मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा!!

महाराष्ट्रातील शासकीय कामामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास सुरूवात झाली आहे. या डिजिटल गव्हर्नन्स आणिराईट टू सर्विसमध्ये महाराष्ट्राला देशात मॉडेल करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून सहकार्य दिले जाईल.

MPSC exam

MPSC exam : MPSC परीक्षांचे वेळापत्रक UPSC प्रमाणे स्थिर करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी परीक्षांचे वेळापत्रक (कॅलेंडर) यूपीएससीप्रमाणे निश्चित करणार असल्याचे विधानपरिषदेत सांगितले. गेल्या पाच-सात वर्षांपासून विविध न्यायालयीन आदेशांमुळे वेळापत्रक बदलावे लागत असल्याचे सांगत त्यांनी यापुढे पारदर्शक आणि नियोजित पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

Ram Sutar

Ram Sutar ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला २०२४ चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

Nagpur violence

Nagpur violence : नागपूर हिंसाचाराचा FIR समोर; 38 वर्षीय फहीम खानवर जमाव जमवल्याचा आरोप

नागपूर हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेला हिंसाचार समोर आला आहे. त्यात 38 वर्षीय फहीम खान नामक व्यक्तीवर जमाव गोळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : ‘महाटेक’च्या माध्यमातून महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने गती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात घेतलेल्या बैठकीत राज्याच्या भविष्यवेधी विकासासाठी भूस्थानिक आणि माहिती तंत्रज्ञान यांची सांगड घालून ‘महाटेक’ संस्थेची निर्मिती करण्याचे निर्देश दिले. या संस्थेमुळे राज्याच्या नियोजन प्रक्रियेला गती मिळेल आणि ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टपूर्तीत मोठा हातभार लागेल.

Nagpur violence

नागपूरच्या दंगलीत “सर तन से जुदा” नारे पोस्ट करत आगीत तेल; भडकाऊ सोशल मीडिया पोस्ट्सवर ४ FIR; तर ६ जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल!!

नागपूर मध्ये औरंगजेब समर्थकांनी केलेल्या दंगलीत सर तन से जुदा, अल्ला हो अकबर वगैरे नारे पोस्ट करत आगीत तेल ओतण्याचे काम शेकडो सोशल मीडिया कर्मींनी केले. त्यांच्याविरुद्ध नागपूर पोलिसांनाज् ४ fir दाखल केले

Konkan Railway

Konkan Railway : कोकण रेल्वे महामंडळाच्या विलिनीकरणास संमती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले की, कोकण रेल्वे महामंडळाला सतत तोटा सहन करावा लागत असून आवश्यक गुंतवणुकीसाठी निधी उपलब्ध नाही. त्यामुळे केंद्र सरकारने कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला होता. चार राज्य एकत्रित येऊन हे महामंडळ तयार झालं होत.

Devendra Fadnavis

महिलांच्या सुरक्षिततेसह कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी सरकार प्रयत्नशील – देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातील गृह विभागाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना राज्यातील महिला सुरक्षा व गुन्हेगारी नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांवर प्रकाश टाकला. मुख्यमंत्री म्हणाले, महिलांनी तक्रार दाखल करण्यात पुढाकार घेतल्यामुळे न्याय मिळवणे सोपे झाले आहे.

वाजपेयी + फडणवीसांनी सांगितलेल्या राजधर्माची गोष्ट आणि त्या पलीकडले सत्य…!!

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी लोकमतच्या कार्यक्रमामध्ये घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मंत्री नितेश राणे यांना उद्देशून राजधर्म सांगितला

Yogesh Kadam

Yogesh Kadam : पोलिसांवर हात उगारणाऱ्यांना पोलिसी धाक दाखवणार; ​​​​​​​गृहराज्य मंत्री योगेश कदमांचा इशारा

नागपूर हिंसाचारात पोलिसांवर हात उगारणाऱ्या दंगलखोरांना पोलिसांचा धाक काय असतो हे दाखवून देऊ, असा इशारा राज्याचे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी बुधवारी विधिमंडळ परिसरात बोलताना दिला. यावेळी त्यांनी जनतेला सोशल मीडियावर हिंसाचाराचे व्हिडिओ व्हायरल न करण्याचेही आवाहन केले.

Devendra Fadanvis

Devendra Fadanvis : फडणवीसांची मोठी घोषणा- UPSCच्या धर्तीवर MPSC भरती प्रक्रियेतही कॅलेंडर; परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात

यूपीएससीच्या धर्तीवर राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत देखील कॅलेंडर निश्चित केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. एमपीएससीची परीक्षा या वर्षीपासून आपण डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात घेणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. यासाठी काही नागरिकांचा विरोध आहे.

CM Fadnavis

CM Fadnavis : बेशिस्त नियम खपवून घेतले जाणार नाहीत; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रील्सच्या लक्षवेधीवर CM फडणवीसांचे उत्तर

राज्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी सोशल मीडियावर रील्स तयार करून आपण काम करत असल्याचे भासवतात. आता अशा बेशिस्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सरकार नवीन जीआर काढणार आहे. बेशिस्त नियम खपवून घेतले जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आमदार परिणय फुके यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली होती. त्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सदरील माहिती दिली.

CM Fadnavis

CM Fadnavis : गुन्हेगारीत महाराष्ट्राचा देशात 8वा क्रमांक; 2023च्या तुलनेत 2024 मध्ये गुन्ह्यांच्या संख्येत घट, CM फडणवीसांची विधानसभेत माहिती

मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी मांडली. गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आठव्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश ही प्रमुख राज्ये महाराष्ट्राच्या पुढे असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच दोन दिवसांपासून चर्चेत आलेल्या नागपूर शहराचा सातवा क्रमांक लागत असल्याचे ते म्हणाले. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये गुन्ह्यांच्या संख्येत 2 हजार 586 ने घट झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

MLA Parinay Phuke

MLA Parinay Phuke: नागपूर हिंसाचारामध्ये अर्बन नक्षलवाद्यांचा सहभाग; आमदार परिणय फुकेंचा गंभीर आरोप

नागपूरमध्ये सोमवारी रात्री मोठा हिंसाचार झाला होता. हा मुद्दा आज विधानसभेतही गाजला. नागपूरच्या घटनेवरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. त्यातच आता नागपूरमधील हिंसाचारामागे अर्बन नक्षलवाद्यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजपचे आमदार परिणय फुके यांनी सभागृहात केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र शहरी नक्षलवादविरोधी कायदा 2024 लवकरात लवकर अंमलात आणण्याची मागणी केली.

Disha Salian दिशा सालियनच्या वडिलांची हायकोर्टात याचिका; मुलीवर बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप, सीबीआयकडे तपास देण्याची मागणी

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यूबाबत पुन्हा चौकशी करण्यासाठी तिचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Devendra fadnavis काही भरवसा नाही!!; ठाकरे + पवारांचा किमान शब्दांत कमाल ** करून नागपूरकर फडणवीसांची पुणेकरांवर मात!!

एखाद्याचा किमान शब्दांत कमाल “उल्लेख” करणे, हे आवली पुणेकरांचे वैशिष्ट्य पुलंनी आपल्या तुम्हाला पुणेकर व्हायचे, नागपूरकर की मुंबईकर??, या कथाकथनात टिपले

Devendra fadnavis पवार + जयंत पाटलांसारखे प्रगल्भ विरोधक जर केंद्रात असते, तर लोकशाही अधिक बळकट झाली असती; फडणवीसांचा काँग्रेसला टोला!!

शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासारख्या प्रगल्भ नेत्यांचे पक्ष जर केंद्रात प्रमुख विरोधी पक्ष असते, तर लोकशाही अधिक बळकट झाली असती अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला टोला हाणला.

औरंगजेब मुद्द्यावर संघाने कान टोचल्याची माध्यमांमध्ये चर्चा; प्रत्यक्षात प्रतिनिधी सभेत बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचार आणि संघशताब्दी मुद्द्यांवर भर!!

औरंगजेब मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्याच परिवारातल्या संघटनांचे कान टोचल्याचे माध्यमांमध्ये चर्चा असली तरी प्रत्यक्षात संघाच्या प्रतिनिधी सभेत बांगलादेशातील हिंदुंवर झालेल्या अत्याचाराबाबत चर्चा

Manikrao Kokate

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना तूर्तास दिलासा; सत्र न्यायालयाच्या आदेशाला तातडीची स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा देण्यात आला आहे. नाशिक कोर्टाच्या आदेशाला तातडीची स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. तसेच प्रकरणाची सुनावणी 21 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

संघ प्रवक्त्यांच्या एका वाक्यावर काँग्रेस + राष्ट्रवादीवाले हुरळले; संघाचे अभिनंदन करून औरंगजेबाचे महिमा मंडन चालू ठेवले!!

संघ प्रवक्त्यांच्या एका वाक्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाले हुरळले; संघाचे अभिनंदन करून औरंगजेबाचे महिमा मंडन चालू ठेवले.

Raosaheb Danve

Raosaheb Danve : रावसाहेब दानवे म्हणाले- नागपूर घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यामुळे हिंसाचार घडला

औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील राजकारण तापले असून मंगळवारी रात्री नागपूर शहरात हिंसाचार उसळला होता. नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसवर मोठा आरोप केला आहे

Prashant Koratkar

Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरला कोर्टाचा दणका; अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; पोलिसांना शरण येण्याशिवाय पर्याय नाही

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी तथा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने मंगळवारी कथित पत्रकार प्रशांत कोरटकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून वेगळ्याच संशयाची पेरणी; पण प्रत्यक्षात नागपूरचा दंगा ही तर मास्टर माईंड फहीम खानची करणी!!

नागपुरात औरंगजेब प्रेमींनी केलेल्या दंगली बाबत अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून वेगळ्याच संशयाची पेरणी झाली. नागपूरच्या दंगलीमागे प्रशांत कोरटकर तर नाही ना, असा संशय अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात