राज्य सरकारने शेतकऱ्यांचे हितासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जमिनीची हिस्सेवाटप मोजणी आता केवळ 200 रुपयात होणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे शेतीची तसेच जमिनीची मोजणी आणि हिस्सेवाटप आता कमी खर्चात होणार आहे.
आपण काय बोलतो आणि त्याच्यावर समोरच्याची काय प्रतिक्रिया येऊ शकते याचे भान सुटलेला नेता, बेभान नेता म्हणजे उद्धव ठाकरे, अशी टीका भाजप नेते व मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी गेल्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस
भारत जगातील सर्वात मोठी स्टार्टअपशक्ती बनेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. चीननंतर भारतात सर्वाधिक स्टार्टअप्स उदयाला आलेत. त्यामुळे भविष्यात भारत जगातील सर्वात मोठी स्टार्टअप शक्ती बनेल, असे ते म्हणालेत.
महाराष्ट्रात भाजपने आपल्या सत्तेच्या वळचणीला घेतलेल्या “पवार संस्कारितांचे” राजकीय उपद्रवमूल्य वाढत चालल्याचे पहिल्या सहा महिन्यांमध्येच समोर आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार “भाजपामय” होत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.
शरद पवारांनी महाराष्ट्रात महिला धोरण आणले. त्यांनी मुलीला मुलाप्रमाणे वाढविले. महाराष्ट्रात महिलांना आरक्षण देऊन त्यांचे सक्षमीकरण केले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात सरकारने राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर केले. या निर्णयांतर्गत सरकार सुमारे 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मंत्रिमंडळाने धुळे जिल्ह्यातील सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेच्या 5329.46 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चासही मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे 52,720 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
कल्याण पूर्व मधील मंगलराघो नगर परिसरात आज दुपारी एक हृदयद्रावक आणि धक्कादायक दुर्घटना घडली. सप्तशृंगी नावाच्या चार मजली इमारतीतील दुसऱ्या मजल्याचा स्लॅब अचानक कोसळला आणि थेट तळमजल्यावर आदळला. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकून 6 जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला नव्या पिढीतला “शोध” “थकला”; तो छगन भुजबळ यांच्यापाशीच येऊन थांबला!!, असे म्हणायची वेळ छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशाने आणली.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पाकच्या कुरापतींविरोधात विविध देशांत सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी यावर टीका केली होती. त्यानतंर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी पक्षीय राजकारण करण्याची काहीही गरज नसल्याचे ठणकावून सांगत संजय राऊतांना खडेबोल सुनावलेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन, मुंबई येथे ‘सन 2024-25 वर्षासाठीच्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या सर्व समित्यांचे एकत्रित उदघाटन’ संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘करिअर ट्रेनिंग प्रोग्राम’ अंतर्गत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे भारतीय विदेश सेवेतील अधिकार्यांसमवेत (IFS) बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2013-14 तुकडीतील भारतीय विदेश सेवेतील 14 अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये छगन भुजबळ यांनी एन्ट्री केली. धनंजय मुंडे यांच्याकडे खाते त्यांना देण्यात आले.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर आले असताना मुंबईतील विधान भवनाच्या प्रवेशद्वारालगत आग लागल्याची घटना घडली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘राज्यस्तरीय बँकर्स समितीची 167वी बैठक’ संपन्न झाली.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत देशसेवेसाठी किंवा कुठल्या आंदोलनात सहभागी झाले होते, म्हणून तुरुंगात गेले नव्हते तर पत्राचाळ प्रकरणात गैरव्यवहार केला, म्हणून तुरुंगात गेले हाेते, असे हल्लाबाेल विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डाॅ. नीलम गाेऱ्हे यांनी राऊत यांच्यावर केला
ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे ‘नरेडको विदर्भ – चेंज ऑफ गार्ड कार्यक्रम’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की, पॉझिटिव्ह इंटरव्हेन्शन हा नरेडकोचा सर्वात महत्त्वाचा गुण आहे. नरेडको संस्था विकासक, सरकार आणि ग्राहक अशा सर्वांच्या हिताचे रक्षण करण्याकरिता सातत्याने काम करत आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘नरेडको विदर्भ – चेंज ऑफ गार्ड कार्यक्रम’ येथे पदग्रहण केलेल्या, जेन नेक्स्ट आणि वुमन्स विंग या सर्वांचे अभिनंदन केले.
दोन दिवसांपूर्वी परळी तालुक्यात मारहाण झालेल्या शिवराज दिवटे या तरुणाची अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात जाऊन माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी भेट घेत त्याच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच शिवराज व त्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.
“बाल वाङ्मयाच्या” प्रकाशनात शरद पवारांची राजकीय फटकेबाजी; PMLA कायदा रद्द करून भ्रष्टाचारी नेत्यांच्या बचावाची तयारी!!, असा प्रसंग काल मुंबईत घडला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे खोटारड्या लोकांतील हिरो आहेत. शिवसेनेतील उठावापसून आजपर्यंत ते एकही वाक्य खरे बोलले नाहीत, अशी टीका सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे इव्हिनिंग वॉक करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
भारतातील इसीस (ISIS) संलग्न दहशतवादी कारवायांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) मोठे यश मिळाले आहे.
अंदमानमधील ऐतिहासिक सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचा महाराष्ट्र शासनाचा ठाम निर्णय असल्याचे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी जाहीर केले आहे. सावरकरांच्या त्यागमय जीवनाचे स्मरण करून भावी पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या या स्मारकासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कारागृहात असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपमानास्पद भाषा वापरल्याचा गंभीर आरोप मत्स्य व बंदर विकास मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. “तुरुंगात राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना शिव्या दिल्या, त्यांची लायकी काढली आणि हे सगळं इतर कैद्यांच्या समोर बो
भर उन्हाळ्यात एकमेकांना दिलेले व्हॅलेंटाईनचे गुलाब सुकले, पण ठाकरे बंधूंचे ऐक्य चर्चेच्या गुऱ्हाळाच्या चरकातच अडकून पडले!!, अशी अवस्था उद्धव आणि राज ठाकरे यांच्या पक्षांच्या राजकीय ऐक्याची झाली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला. भारताने त्वरित ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला कडक प्रत्युत्तर दिले, मात्र हल्लेखोर दहशतवादी अजूनही फरार आहेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App