महायुती सरकारच्या काही लोकप्रिय योजनांमुळे आमदारांना मागील 10 महिन्यांपासून कोणताही निधी मिळाला नसल्याचा दावा सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या गोटात एकच खळबळ माजली आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील सर्व लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत, असे आदेश कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून जारी करण्यात आले. तसेच छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, नागपूर या महापालिकांनी सुद्धा हा आदेश दिला आहे. त्यानुसार 15 ऑगस्टला रात्री 12 पासून 15 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत पर्यंत प्राण्यांची कत्तल करू नये, असे आदेश महापालिकेने दिले आहेत. जनावरांची कत्तल आणि मांसविक्री केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील सर्व लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत, असे आदेश कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून जारी करण्यात आले. त्यानुसार 15 ऑगस्टला रात्री 12 पासून 15 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत पर्यंत प्राण्यांची कत्तल करू नये, असे आदेश महापालिकेने दिले आहेत. शिवाय मांस विक्रीही या दिवशी करू नये असे महापालिकेने सांगितले आहे. जनावरांची कत्तल आणि मांसविक्री केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.
निवडणुका आल्या की मनोज जरांगे पाटील बाहेर पडतात. काहीतरी बेताल विधाने करून, आरोप-प्रत्यारोप करून स्वत:ला मीडियामध्ये चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांनी केला.
एका अज्ञात व्यक्तीने शनिवारी सकाळी बीडच्या जिल्हा कारागृहात एक गांजा भरलेला चेंडू फेकला आणि त्या गांजा वाटपावरून चार कैंद्यामध्ये जोरदार राडा झाला. हा राडा एवढा शिगेला पोहोचला, की गांजाच्या मोहापाई तिथल्या कैद्यांनी थेट पोलीस कर्मचाऱ्यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली.
विधिमंडळात घुसून मारामारी करणाऱ्या नितीन देशमुखचा शरद पवारांच्या पक्षात सन्मान; जितेंद्र आव्हाडांनी प्रवक्ते पद देऊन “वाढविला” “मान”!!, असे आज घडले.
भिवंडीमध्ये भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षासह त्याच्या एका सहकार्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी अशी हत्या झालेल्या तरुणांची नावं आहेत. प्रफुल्ल तांगडी हा भाजपा युवा मोर्चाचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होता.
कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे मानवी आरोग्याला धोका असल्याने, मुंबई महापालिकेने कबुतरखान्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. नंतर मुंबई उच्च न्यायालयाने या निर्णयाला संमती दिली होती आणि आता सर्वोच्च न्यायालयाने देखील तोच निर्णय कायम ठेवलेला आहे. तसेच बंदीचा आदेश मोडून कबुतरखान्यांच्या जागी काबुतारंना दाणे टाकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून, या बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करा. या उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधातील अपील सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळले.
खंडणीखोरांचे सरदार आपणच आहात. उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटीन ठेवून तुमच्या नेतृत्वात शंभर कोटींची वसुली सुरू होती. जनता हे विसरली नाही. त्यामुळे फडणवीसांवर टीका करताना आपला भूतकाळ आठवा,असा पलटवार भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
मुंबईत राजकीय तापमान चढवणारा शाब्दिक वाद सुरू झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी महायुती सरकारवर आणि विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर “चीफ नव्हे तर थीफ मिनिस्टर” असा आरोप करत जोरदार हल्ला चढवला होता. त्यांच्या या वक्तव्यावर ज्येष्ठ भाजप नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट पलटवार करत उद्धव ठाकरेंवर खंडणीखोरीचे गंभीर आरोप लावले.
जिल्ह्यातील राजगुरूनगर तालुक्यातील कुंडेश्वर येथे आज दुपारी एक भीषण अपघात झाला. महादेवाच्या दर्शनासाठी निघालेली भाविकांची पिकअप व्हॅन भरधाव वेगात दरीत कोसळली. या अपघातात 9 महिला भाविकांचा मृत्यू झाला असून 35 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांपैकी 7 जणींचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोन महिलांनी रुग्णालयात नेताना प्राण सोडले.
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतांनाच, आणखी एका विवाहितेने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे. रक्षाबंधनाला भावाने २० लाख रुपये नाही दिले तर त्याला मारून टाकू, अशी धमकी नवऱ्याने विवाहितेला दिली होती. त्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर लावलेल्या मत चोरीच्या आरोपानंतर देशातील राजकारणात एकच खळबळ उडाली. राहुल गांधींपाठोपाठ आता बरेच बडे नेतेही या विषयावर अनेक धक्कादायक खुलासे करत आहेत. याच विषयावर शरद पवार यांनी देखील एक धक्कादायक विधान केलं होतं. राज्यातील २०२४ विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत असतांना दोन लोकं आपल्याला भेटायला आलेली. त्यांनी आपल्याला १६० जागा जिंकवून देण्याची खात्री दिली होती, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
बीडच्या कारागृहातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने शनिवारी सकाळी बीडच्या जिल्हा कारागृहात एक गांजा भरलेला चेंडू फेकला आणि त्या गांजा वाटपावरून चार कैंद्यामध्ये जोरदार राडा झाला. हा राडा एवढा शिगेला पोहोचला, की गांजाच्या मोहापाई तिथल्या कैद्यांनी थेट पोलीस कर्मचाऱ्यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली.
आर्थिकदृष्ट्या सक्षम देशांकडून सध्या गुंडगिरी सुरू आहे.” असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाव न घेता अमेरिकेला टोला लगावला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. तसेच, भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला. दोघांनी भेटून विधानसभेत १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती असे दावा त्यांनी केला. आता नाव आठवत नाही असे ते म्हणाले. यावरून प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला असून किती खोटं बोलावं यालाही एक मर्यादा असते असे ते म्हणाले.
जरांगे नावाच्या बबड्याला रसद पुरवणारे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे, भेट देणारे शरद पवार आज ओबीसींच्या बाजूने मंडल यात्रा काढत आहेत. शरद पवार हे इच्छाधारी नागाप्रमाणे वेटोळे घालून बसले आहेत, असा हल्लाबोल ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
शरद पवारांनी 160 जागांसंदर्भात केलेला दावा हा वराती पाठीमागून घोडे असल्यासारखे आहे. आम्ही यापूर्वी सगळ्या पक्षांना कोर्टात जाण्याचे आवाहन केले होते, पण तेव्हा कोणीही सोबत आले नाही. आता फक्त बोंबलत बसले आहेत. किती खोटे बोलावे, यालाही एक सीमा असते,” अशी बोचरी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ‘मंडल यात्रे’वर टीका करत गंभीर आरोप केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑनलाईनच्या माध्यमातून नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे. यासोबतच महाराष्ट्राला देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस मिळाली आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर येथे या वंदे भारत एक्सप्रेसची पाहणी केली. एक्सप्रेसच्या उद्धाटनाला नागरिक देखील मोठ्या संख्येने पोहोचले होते. या गाडीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नागपूर ते पुणे हा 16 तासांचा प्रवास आता केवळ 12 तासांत पूर्ण होणार आहे.
बेरजेचे राजकारण करताना वजाबाकी नाही झाली म्हणजे मिळवली!! किंबहुना ओबीसींना जवळ करताना हाती असलेल्या मराठ्यांना गमावले नाही म्हणजे मिळवले!!, असे म्हणायचे वेळ शरद पवार यांच्या मंडल यात्रेने आणली.
दोन लोक भेटल्याच्या मुद्द्यावर किती खोटं बोलावं यालाही मर्यादा असते, अशा शब्दांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांना टोला हाणला. निवडणूक प्रक्रिया 2004 पासून मॅन्युप्युलेट होते आहे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी शुक्रवारी नागपुरात म्हटले – जग भारताला त्याच्या अध्यात्मासाठी (आध्यात्मिक ज्ञानासाठी) महत्त्व देते. म्हणूनच ते आपल्याला विश्वगुरू मानतात. आपली अर्थव्यवस्था किती वेगाने वाढत आहे याची जगाला चिंता नाही.
श्रीमंत मराठ्यांना ओबीसी समाजाने विरोध करू नये, यासाठी शरद पवारांनी मंडल यात्रा काढली, अशा शब्दांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पवारांच्या जातीय राजकारणाची पोलखोल केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रक्षाबंधनानिमित्त महिलांना मोठे आश्वासन दिले आहे. “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजना पुढील पाच वर्षे सुरूच राहणार आहे. सध्या मिळणाऱ्या मानधनात आणखी वाढ केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. मुलुंड येथे आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. या वेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
महिला आणि मराठा राजकारण करून थकले; ओबीसी राजकारणाच्या आश्रयाला पोहोचले!!, हेच आजपासून सुरू झालेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडल यात्रेचे वर्णन करावे लागेल.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App