मौलाना आझाद कॉलेजच्या अध्यक्षा पद्मश्री फातिमा झकेरिया यांचे एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातलं उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांचा दफनविधी संध्याकाळी रात्री उशिरा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. 2006 मध्ये त्यांना पद्मश्री सन्मानाने गौरवण्यात आले होते. PadmaShri Fatima Zakaria passes away
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : मौलाना आझाद कॉलेजच्या अध्यक्षा पद्मश्री फातिमा झकेरिया यांचे एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातलं उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांचा दफनविधी संध्याकाळी रात्री उशिरा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. 2006 मध्ये त्यांना पद्मश्री सन्मानाने गौरवण्यात आले होते.
औरंगाबाद येथील मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा म्हणून फातिमा झकेरिया यांची अवघ्या देशभरात ओळख होती. फातेमा झकेरिया यांचा जन्म मुंबईत 17 फेब्रुवारी 1936 रोजी झाला. 1963 मध्ये त्यांची संस्थेच्या ट्रस्टवर नियुक्ती झाली. त्याचे पती डॉ. रफिक झकेरिया यांचे 2005 मध्ये निधन झाल्यानंतर मौलाना आझाद शिक्षण संस्थेची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. कतार सरकारच्या व्हाइस प्राइस फॉर एज्युकेशन ज्युरी म्हणून निवड होणाऱ्या आशिया खंडातील पहिल्या महिला म्हणून त्यांना मान मिळाला होता.
मुंबई येथील निर्मला निकेतन महाविद्यालयात फातिमा झकेरिया यांनी सोशल सायन्समध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. सामाजिक क्षेत्रातही फातिमा झकेरिया यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी महिला आणि मुलांच्या विकासाच्या दृष्टीने मोठे योगदान दिले आहे. 2005 ते 2012 या कालावधीत त्यांनी आयएचएममध्ये पदव्युत्तर आणि पीएचडीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली. डॉ. रफिक झकेरिया हायर लर्निंग रिसर्च कोर्स यासह एकूण 20 नवीन अभ्यासक्रम त्यांनी विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेत सुरू केले.
मुलींच्या सर्वांगीण विकास आणि शिक्षणासाठी फुलवारी नावाची शाळा सुरू केली. या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे शाळेत शिपायापासून सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या महिलाच आहेत. आजवर विद्यापीठात असलेला यूजीसी मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाचे स्त्री अभ्यास केंद्र होते. त्यानंतर दुसरे मोठे केंद्र त्यांनी आझाद कॅम्पसमध्ये सुरू केले. झकेरिया यांनी पत्रकारितेतही लक्षणीय काम केले आहे. टाइम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया’, ‘द डेली’मध्ये त्यांनी काम केले. ‘द ताज मॅगझिन आर्ट जर्नल ऑफ द ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स मासिका’चे संपादनही त्यांनी पाहिले.
PadmaShri Fatima Rafiq Zakaria passes away
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App