विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्रात पावसाने अतोनात नुकसान झाल्यानंतर आता पुन्हा एकदा निसर्गाचा रूद्रावतार दिसणार आहे .कोकण आणि गोव्यासाठी 30 आणि 31 जुलैला ऑरेंज अलर्ट दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे हा अलर्ट देण्यात आला आहे. IMD ने हा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. एवढंच नाही तर पुढचे पाच दिवस हे पावसाचे असणार आहेत असंही सांगण्यात आलं आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे येत्या 24 तासात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच कोकण आणि गोवा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान पश्चिमेचे वारे वेगाने वाहतील, त्यामुळे कोकण आणि गोव्यात संततधार राहिल असं पुणे हवाम खात्याचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितलं आहे.
नैसर्गिक आपत्ती ही कोणत्याही क्षणी येऊ शकते, येणाऱ्या संकटासाठी लोकांनी तयार असावं म्हणून हा अलर्ट जारी करण्यात येतो. या कालावधीत वीज पुरवठा खंडीत होणं, वाहतूक ठप्प होणं घडू शकतं. पुढच्या संकटाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने ऑरेंज अलर्ट देण्यात येतो. गरज असेल आणि अति महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असं या अलर्टमध्ये सांगण्यात येतं.
एवढंच नाही तर आयएमडीने म्हणजेच भारतीय हवामान खात्याने पुढचे चार दिवस पावसाचे असतील असंही स्पष्ट केलं आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने महाराष्ट्रात दाणादाण उडवली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App