विशेष प्रतिनिधी
पुणे : धानोरी-लोहगाव रस्त्यावर महापालिकेच्या वतीने संयुक्त अतिक्रमण कारवाई करण्यात आली हाेती. यावेळी अतिक्रमण कारवाईला विरोध करत स्थानिक नागरिकांनी अधिकारी, कर्मचारी यांना मारहाण केली. तसेच जेसीबीवर दगडफेक करून कर्मचाऱ्यांना पळवून लावले. Opposition to encroachment action; Beating officers, employees Incident on Dhanori-Lohgaon road
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिक्रमण विभागाचे अधिकारी अनिल परदेशी यांना गंभीर मारहाण करण्यात आली. अक्षरशः खाली पाडून त्यांना मारहाण केली. यावेळी अतिक्रमण विभागाचे पोलीस, सुरक्षारक्षकांनी बघ्यांची भूमिका घेतली. मारहाण व दगदफेकीत अनेक अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. त्यामूळे ही कारवाई थांबविण्यात आली आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात कारवाईला विरोध आणि मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गोंधळानंतर अधिकारी आणि कर्मचारी भयभीत झाले आहेत. अतिक्रमण विभागाचे पोलीस, सुरक्षारक्षक असताना सुद्धा अधिकाऱ्यांना मारहाण होते. तसेच जेसीबी फोडण्यात आला. अशा वेळी सुरक्षा यंत्रणा काय काम करत होती? पोलीस चौकी समोर हा प्रकार घडल्याने स्थानिक नागरिकांना गुंडागर्दी करण्यासाठी कुणाचा राजकीय वरदहस्त आहे असाही सवाल यावेळी उपस्थित झाला आहे.
अतिक्रमण कारवाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना असे वारंवार नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामूळे त्याची दक्षता महापलिका आयुक्तानी घ्यावी अशी मागणी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App