युक्रेन-रशिया युध्दाच्या संकटातही भारतीय रेल्वेने संधी शोधत मेक इन इंडियाचा नारा दिला आहे. वंदे भारत रेल्वेला लागणारी चाके युक्रेनहून आणण्याचे नियोजन होते. मात्र, युध्दामुळे त्याला विलंब होणार असल्याने आता ही चाके बेंगळुरूमधील रेल्वे व्हील फॅक्टरी बनवणार आहे. कारखान्याने चाके बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या भागांसाठी आधीच निविदा काढल्या आहेत. कारखाना आधीच चाकांसाठी एक्सेल बनवत आहे आणि आता चाके देखील बनवेल. Opportunity in Crisis, Instead of importing Vande Bharat Railway wheels from Ukraine, Made in India
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : युक्रेन-रशिया युध्दाच्या संकटातही भारतीय रेल्वेने संधी शोधत मेक इन इंडियाचा नारा दिला आहे. वंदे भारत रेल्वेला लागणारी चाके युक्रेनहून आणण्याचे नियोजन होते. मात्र, युध्दामुळे त्याला विलंब होणार असल्याने आता ही चाके बेंगळुरूमधील रेल्वे व्हील फॅक्टरी बनवणार आहे. कारखान्याने चाके बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या भागांसाठी आधीच निविदा काढल्या आहेत. कारखाना आधीच चाकांसाठी एक्सेल बनवत आहे आणि आता चाके देखील बनवेल.
वंदे भारत या सेमी-हाय स्पीड ट्रेनची रचना आणि निर्मिती भारतात केली जात आहे. मात्र, तिची चाके युक्रेनमधून आयात करण्याची योजना होती. परंतु युक्रेनवर सुरू असलेल्या रशियन आक्रमणामुळे चाकांची आयात थांबली आहे. 128 चाके युक्रेनमध्ये आधीच तयार केली गेली होती. परंतु युद्धामुळे ती रोमानियामध्ये अडकले आहेत. आता त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या महिन्याच्या अखेरीस युक्रेनने बनवलेली चाके भारतात एअर-लिफ्ट केली जातील अशी अपेक्षा आहे. ही चाके 15 मे ते 20 मे दरम्यान बॅचमध्ये चेन्नईला आणली जातील आणि नंतर चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (कउऋ) येथे नेली जातील जिथे वंदे भारत ट्रेनसेट एकत्र केले जात आहेत.
एका वंदे भारत ट्रेनसाठी 128 चाके पुरेशी असतील. 16 डबे आहेत आणि प्रत्येक रेल्वे कोच 8 चाकांवर चालतो. रोमानियामध्ये अडकलेल्या युक्रेनमधील 128 चाके सोडून इतर दोन परदेशी कंपन्यांकडे मागवलेली इतर चाकेही पुढील महिन्यापर्यंत भारतात पोहोचतील. या चाकांचा वापर वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या नवीन आवृत्ती २ च्या चाचणीसाठी केला जाईल. पुढील वर्षी १५ ऑगस्टपर्यंत नियोजित 75 वंदे एक्स्प्रेस गाड्यांना पुरेशी चाके उपलब्ध आहेत. रेल्वे व्हील फॅक्टरी 2-3 महिन्यांत आवश्यक संख्येत चाके तयार करेल.
सध्या दिल्ली आणि वाराणसी आणि दिल्ली आणि वैष्णोदेवी कटरा दरम्यान फक्त दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालवल्या जात आहेत. या वषार्पासून आणखी काही ठिकाणी ही रेल्वे चालणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App