प्रतिनिधी
मुंबई : संभाजीराजे छत्रपतींना पाठिंबा देण्याऐवजी शिवसेनेने राज्यसभेसाठी संजय पवार यांची उमेदवारी जाहीर केली. या मुद्द्यावरून मराठा मोर्चा समन्वय संतप्त झाले असून त्यांनी शरद पवारांना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संभाजीराजे यांच्या विश्वासघात करू नये, असा इशारा दिला आहे. शरद पवारांना आपल्यावरचा विश्वासघातकी हा शिक्का पुसण्याची संधी आहे. तसेच स्वतः मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजे यांना पाठिंबा द्यावा. त्यांचा विश्वासघात करू नये, असा इशारा मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी दिला आहे. Opportunity for Pawar to erase the seal of betrayal
संभाजीराजे मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये पोचल्यानंतर मराठा मोर्चाचे काही समन्वयक त्यांच्या भेटीला गेले होते. त्यांची भेट घेतल्यानंतर या समन्वयकांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची नावे घेऊन त्यांना इशारे दिले आहेत.
त्याच बरोबर करण गायकर आणि विनोद पाटील यांनी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीला अनुकूल आहेत. संजय राऊत यांनी त्यामध्ये खोडा घालू नये, असा इशारा या दोघांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App