विशेष प्रतिनिधी
सोलापूर : शहर जिल्हा मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या वतीने कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी १हजार चादरी मदत म्हणून रवाना करण्यात आल्या.
कोल्हापूर येथे पंचगंगा आणि कृष्णाचा मोठा महापूर आला आहे. कोकणात देखील पावसाने थैमान घातले. अशातच लोकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. नागरिकांचे संसार उघड्यावर आले. अशा संवेदनशील परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पूरग्रस्तांना १००० चादरीची मदत सोलापूर हून पाठवीत आहोत.
शनिवारी सायंकाळी सोलापूरी चादरी घेऊन कोल्हापूरकडे वाहन रवाना झाले. मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा शाडो सहकार मंत्री दिलीप बापू धोत्रे यांच्या माध्यमातून ही मदत पोहोचती करण्यात येत आहे. तसेच पूरग्रस्तांना अधिकची मदत करण्याच्या दृष्टीने उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
दिलीप धोत्रे म्हणाले , महापुरामुळे नागरिकांचे संसार उघड्यावर आले. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून आर्थिक कंबरडे देखील मोडले आहे. त्यामुळे राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने एक माणुसकीचा हात म्हणून आपण मदत पाठवत आहोत. तसेच आजपासून वेगवेगळे उपक्रम राबवून वेगवेगळ्या माध्यमातून मदत पाठवण्याचा प्रयत्न सुरूच राहणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App