आरोग्य विभागात एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरली जाणार – टोपे

विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद – आरोग्य विभागातील ‘क’ व ‘ड’ संवर्गातील बारा हजार पदे भरतीसाठी खासगी एजन्सी निश्चिhत झाली आहे. नऊ ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यासाठी जाहिरात देणार आहे. येत्या चार दिवसांत आणखी एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरली जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

टोपे म्हणाले, ‘क’ व ‘ड’ वर्गातील पदे भरतीसाठी निश्चित केलेल्या खासगी एजन्सीसोबत करार करून बारा हजार पदांसाठी अर्ज मागविले जातील. यासंदर्भात काढल्या जाणाऱ्या जाहिरातीत भरती प्रक्रियेचे सर्व नियम, निकष असतील. गट ‘अ’चे एक हजार डॉक्टर, ‘स्पेशालिस्ट’ व ‘एमबीबीएस’ डॉक्टर्स भरले.



त्याच पद्धतीने हीच आणखी एक हजार पदे येत्या चार दिवसांत भरणार आहोत. या पदांसाठीची प्रक्रिया दुसऱ्या एका एजन्सीमार्फत राबविली जाणार आहे. गट ‘अ’मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी समुपदेशन पद्धतीने परीक्षा न घेता गुणांवरच नेमणुका केल्या जातील.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात