विशेष प्रतिनिधी
मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सक्त वसुली संचालयाने अटक केलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते. मात्र, आता राष्ट्रवादीने एक पाऊल मागे घेतले आहे. मलिक यांच्याकडून त्यांच्या दोन्ही खात्यांचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे.One step back from the NCP, Nawab Malik is now the Minister of no ministry
मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षाने रान उठविले आहे. निदान त्यांचा कार्यभार तरी काढून घ्या अशी मागणी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक पाऊल मागे घेतले. पवारांनी घेतलेल्या बैठकीत नवाब मलिक यांचा राजीनामा न घेता कार्यभार दुसऱ्यांकडे सोपविण्यात येणार आहे.
परभणीत धनंजय मुंडे व गोंदीयात प्राजक्त तनपुरे यांच्याकडे पालकमंत्री पदाचा देणार येणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. अल्पसंख्याक खात्याचा कारभारही दुसऱ्यांकडे दिला जाणार असून मुख्यमंत्र्यांशी बोलुन अंतीम निर्णय घेणार आहोत असेही त्यांनी सांगितले.
नवाब मलिक यांचा मुंबई अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार महानगर पालिकेतील गटनेत्या राखी जाधव तसेच नरेंद्र राणे यांच्याकडे दिला जाणार आहे.मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली असून प्रकरण अजूनही न्यायालयात आहे.
नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर मलिक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली होती. पण, मलिक यांचे प्रकरण हे भाजपने मुद्दामहुन काढले आहे. त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नसल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले व मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादीने फेटाळून लावली होती. त्यानंतर भाजप नेते अधिकच आक्रमक झाले होते. त्यानंतरही राजीनामा न घेण्याच्या निर्णयावर शरद पवार ठाम होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App