विशेष प्रतिनिधी
मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य सेवांबाबत निर्माण झालेल्या गोंधळावर आणखी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. शहर व उपनगरातील आमदार आणि नगरसेवकांनी लसीकरण आणि निर्जंतुकीकरणाबाबत आपापल्या प्रभागांचे कृतिशील नियोजन करावे, अशी सूचना याचिकेत केली आहे. One more petition in high court regarding vaccination
ॲड. अंजली नवले यांनी याचिका केली असून राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि पोलिस आयुक्तांना प्रतिवादी केले आहे.
तसेच लसीकरणावेळी होत असलेली गर्दी पाहता लोकप्रतिनिधींनी त्याबाबत नियोजन करावे असेही म्हटले आहे. महापालिका आणि सरकारने पोर्टल सुरू करावे, तक्रारींबाबत ई-मेल शेअर करावा, नियम मोडणाऱ्या नागरिकांवर काय कारवाई केली याचा तपशील द्यावा आदी मागण्या केल्या आहेत. न्यायालयात यासंबंधित दोन जनहित याचिका यापूर्वी करण्यात आल्या आहेत.
ऑक्सिजन, औषधे आणि खाटा मिळण्यासाठी होणारा विलंब, निर्जंतुकीकरण करण्यासाठी आवश्यक जागरूकतेचा अभाव आणि लसीकरण मोहिमेबाबत प्रामुख्याने याचिकेत तपशील दिला आहे. अनेक आस्थापनांकडून कर्मचारी बाधित झाल्यावर निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे इतर नागरिकांनाही धोका निर्माण होऊ शकतो असे म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App