वृत्तसंस्था
नवी दिल्ली : नियमानुसार ज्या रुग्णांकडे ऑक्सिजन उपलब्ध नसेल त्यांना रेमडेसिव्हिर देखील दिले जाणार नाही. आता सरकारलाच लोकांना मरताना पाहायचे आहे की काय असा निर्माण होतोय अशा शब्दांत दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवल सरकारची खरडपट्टी काढली आहे. Delhi high court lashes on Kejariwal govt.
राजधानी दिल्लीतील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि कोलमडून पडलेल्या आरोग्य व्यवस्थेवर उच्च न्यायालयाने कठोर शब्दांत ताशेरे ओढले. आता सरकारलाच लोकांना मरताना पाहायचे आहे की काय असे वाटू लागल्याची खंत न्यायालयाने व्यक्त केली.
रेमडेसिव्हिरच्या वापराचा प्रोटोकॉल तयार करताना केंद्र सरकारने डोके वापरल्याचे दिसत नाही अशी खंतही न्यायाधीशांनी व्यक्त केली. न्या. प्रतिभा.एम. सिंह यांच्या पीठासमोर आज याबाबत सुनावणी पार पडली.
दरम्यान याप्रकरणी याचिकाकर्त्यांनी आयसीयू बेडची मागणी न्यायालयाकडे केली होती पण न्यायाधीशांनी सहानुभूती व्यक्त करताना असा बेड उपलब्ध करून देण्यास असमर्थता दर्शविली. अन्य एका खंडपीठासमोर देखील कोरोनाबाबत सुनावणी पार पडली. नागरिकांनी ऑक्सिजन सिलिंडर आणि औषधे यांचा साठा करून ठेवू नये असे आवाहन न्यायालयाने केले आले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App