एका जाहिरातीने काही फरक पडत नाही, आम्ही काल, आज आणि उद्याही सोबतच; देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

प्रतिनिधी

पालघर : आम्ही कालही सोबत होतो, आजही सोबत आहोत आणि उद्याही सोबत राहणार, असे जाहीर करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीत बिनसल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. एका जाहिरातीमुळे काही होईल एवढी शिवसेना – भाजपची युती तकलादू नाही, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पालघरमध्ये ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात ते बोलत होते. One ad doesn’t matter, we are together yesterday, today and tomorrow

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात शिंदे गट व भाजप यांच्यात जाहिरातीवरून वाद सुरू आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज असून युतीत आलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे. अशात आज पालघरमध्ये ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले आहेत. त्यामुळे फडणवीस या कार्यक्रमात काय बोलणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आमची चिंता करू नका

आज मुंबईहून एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टरने एकत्र पालघरला आले. याचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी हेलिकॉप्टरने पालघरला उतरलो तेव्हा मला पत्रकारांनी विचारले शिंदेंसोबत प्रवास करून कसे वाटत आहे. त्यावर मी म्हणालो, आमचा एकत्र प्रवास आताचा नव्हे तर गेल्या 25 वर्षांपासूनचा आहे. गेल्या वर्षभरात आमचा प्रवास आणखी घट्ट झाला आहे. त्यामुळे आमच्या प्रवासची चिंता करण्याचे काहीही कारण नाही.

पदाची लालसा नाही

देवेंद्र फडणवीस म्हणाले, केवळ एका जाहिरातीमुळे किंवा एखाद्या वक्तव्यामुळे आमच्यात काही बिनसेल एवढे तकलादू आमचे सरकार नाही. पहिले भाषण कुणी करायचे, यावरून एकमेकांची गच्ची पकडणारे आम्ही नाही. एखादे पद मिळवण्यासाठी, वैयक्तिक लाभ मिळवण्यासाठी आम्ही सरकार स्थापन केलेले नाही. तर, सर्वसामान्यांच्या जीवनात गुणात्मक बदल व्हावे, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे.

शिंदे हे लोकप्रिय मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून केला. शिंदेसेनेने दिलेल्या जाहिरातीत शिंदे हे फडणवीसांपेक्षा अधिक लोकप्रिय असल्याचा उल्लेख होता. त्यामुळेच शिंदे गट व भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यामुळे आज भाषणात फडणवीसांनीच शिंदेंचा ‘लोकप्रिय’ असा उल्लेख केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

उद्धव ठाकरेंवर टीका

देवेंद्र फडणवीस म्हणाले, वर्षभरापूर्वी राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार आले. तेव्हापासून सरकार खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचले आहे. अन्यथा पूर्वी ‘सरकार आपल्या घरी’, अशी स्थिती होती. हे दोन सरकारमधील अंतर आहे. शासन आपल्या दारी योजनेचे पालघर जिल्ह्यात दोन लाख लाभार्थी आहेत, ही अतिशय अभिमानाची बाब आहे.

‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’, अशी जाहीरात मंगळवारी (ता. 13) महाराष्ट्रातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये झळकली होती. या जाहीरातीतून एकनाथ शिंदे यांनी थेट देवेंद्र फडणवीसांनाच आव्हान दिल्याची चर्चा होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचेही बोलले जात होते. जाहिरात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोल्हापूरमध्ये शिंदे व फडणवीस यांचा संयुक्त कार्यक्रम होता. मात्र, फडणवीस यांनी कानदुखीचे कारण देत शिंदेंसोबत जाणे टाळले होते. त्यामुळे फडणवीसांच्या नाराजींच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, आज या सर्व चर्चांना फडणवीसांनी पूर्णविराम दिला.

One ad doesn’t matter, we are together yesterday, today and tomorrow

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात