प्रतिनिधी
मुंबई : एकीकडे महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची हूल दिली जात आहे, तर दुसरीकडे शिंदे + फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्ताराची देखील चाहूल लागली आहे. शिवसेनेचे तुरुंगातून बाहेर आलेले प्रवक्ते संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या वक्तव्याचा हवाला देत महाराष्ट्रात केव्हाही मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असे वक्तव्य दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. On the one hand, mid-term elections in Maharashtra
संजय राऊतांच्या या वक्तव्याला भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले नेते एकनाथ खडसे यांनी देखील तसाच दुजोरा दिला. महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही म्हणून बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे राज्यात काहीही घडू शकते. राष्ट्रवादीने निवडणुकांसाठी तयार राहिले पाहिजे, असे वक्तव्य खडसे यांनी केले.
मात्र एकीकडे मध्यावधी निवडणुकांची अशी हूल दिली जात असताना दुसरीकडे मात्र शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्तारा संदर्भात बातमी आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाचे 50 आमदार 26 नोव्हेंबर 2022 रोजी पुन्हा एकदा गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत.
ते तेथून परतल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन सर्व नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. ज्या आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळणार नाही, त्यांचे समाधान 75 महामंडळाच्या नेमणुकांद्वारे करण्याचा प्रयत्न शिंदे फडणवीस सरकार करणार आहे. हा मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका केव्हा होतो आणि त्यानंतर महामंडळाच्या नियुक्त्या कशा होतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
त्याचबरोबर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि महामंडळाच्या नियुक्ती झाल्या की महाराष्ट्रात विरोधकांना अपेक्षित असलेली अस्थिरता वाढते की शिंदे फडणवीस यांना अपेक्षित असलेली राजकीय स्थिरता कायम होते?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App