एकीकडे अजितनिष्ठ पवारांचे फोटो वापरणार; दुसरीकडे पवार विरोधी ऐक्य साधणार; पवारांच्या प्रामाणिकपणावर संशय वाढणार!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शिंदे – फडणवीस सरकार मध्ये अर्थमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अजित पवारांनी निकाल सिल्वर ओक वर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. प्रतिभाताई पवारांच्या हातावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांची विचारपूस करण्यासाठी अजितदादा सिल्वर ओक वर गेल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. तिथे कोणतेही राजकारण नसल्याचा दावा त्यांनी केला.On the one hand, Ajitnishta Pawar’s photos will be used; On the other hand, opposition to Pawar will unite

मात्र असे असताना अजितनिष्ठ राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांचे फोटो लावूनच आपले काम करणार आहेत. वास्तविक शरद पवारांनी अजितनिष्ठ राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपले फोटो लावायला प्रतिबंध केला आहे. पण अजितनिष्ठ सरदारांनी शरद पवार आपले दैवत आहेत. त्यामुळे आपण फोटो वापरणारच, असे जाहीर करून त्यांचे फोटो वापरणे थांबवलेले नाही. अजितदादांना अर्थमंत्री म्हणून सहाव्या मजल्यावरचे नव्हे, तर पाचव्या मजल्यावरचे 503 क्रमांकाचे दालन शिंदे – फडणवीस सरकारने दिले आहे. या दालनात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर शरद पवारांचा फोटो आहे.काँग्रेस संशयाने पाहणार

या पार्श्वभूमीवर एकीकडे अजितनिष्ठ राष्ट्रवादी शरद पवारांचे फोटो लावून प्रचार करणार, तर दुसरीकडे स्वतः शरद पवार मात्र विरोधी ऐक्याच्या बैठकांमध्ये सामील होऊन ते ऐक्य साधण्याचा प्रयत्न करणार यामुळे विरोधकांमध्ये विशेषतः काँग्रेस नेत्यांमध्ये शरद पवारांच्या प्रामाणिक भूमिकेविषयी संशय निर्माण झाला आहे. तसेही काँग्रेस नेत्यांनी वेळीच सावध होत महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत तरी स्वबळावर लढण्याची तयारी चालवली आहे. शरदनिष्ठ राष्ट्रवादी कडून विरोधी पक्ष नेतेपद खेचून घेण्यासाठी ते पुढे सरसावले आहेत. त्यामुळे काँग्रेसला शरद पवारांच्या प्रामाणिकपणाविषयी नुसता संशय नाही तर खात्री आहे. त्यामुळे शरद पवार जरी विरोधी ऐक्याच्या बैठकीत वडीलधारे नेते म्हणून बसणार असतील, तरी पवारांना आधी जो मानसन्मान मिळत होता, तो सन्मान इथून पुढच्या काळात मिळणे कठीण आहे.

प्रादेशिक पक्षांमध्येही संशय

बाकीचे प्रादेशिक पक्ष देखील पवारांकडे संशयानेच पाहतील. काँग्रेस आणि काही प्रादेशिक पक्षांचा मोदी विरोध प्रामाणिक आहे. ममता बॅनर्जी यांच्यासारख्या नेत्याची तर ती मोठी राजकीय गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एक आणि राष्ट्रीय राजकारणात दुसरी अशी दुटप्पी भूमिका घेणाऱ्या पवारांच्या प्रामाणिकपणावर ममता बॅनर्जी यांच्यासारखे नेते देखील दाट संशयानेच पाहणार आहेत. त्यामुळे विरोधी ऐक्यामध्ये पवारांचे स्थान पूर्वीसारखे राहणे शक्य नसून ते डळमळीत होऊन पवार दुसऱ्या फळीत ढकलेले जाण्याची शक्यता आहे.

 विरोधी ऐक्यातल्या मानसन्मान ढळला

विरोधी ऐक्याच्या चर्चेत पवारांना एक विशिष्ट स्थान होते. इतर प्रादेशिक पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादीचे संख्याबळ खूप कमी असूनही पवारांना एक ज्येष्ठतेचा मान होता, तो आता राहण्याची शक्यता फार कमी आहे. कारण पवारांची भूमिका दुटप्पी झाल्याने खरे मोदी विरोधक पवारांकडेच दाट संशयाने किंबहुना खात्रीने बघणार आहेत. त्याचे पडसाद बंगलोर मधल्या विरोधी ऐक्याच्या बैठकीत उमटण्याची दाट शक्यता आहे.

On the one hand, Ajitnishta Pawar’s photos will be used; On the other hand, opposition to Pawar will unite

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात