Rafale Jet: भारताने २६ राफेल जेट खरेदीवर केला शिक्कामोर्तब; चीन-पाकिस्तानला धडकी!

France big action to investigate Rafale deal, appointment of judge, many VIPs in siege

भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात लक्षणीय वाढ होणार

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यादरम्यान भारत आणि फ्रान्स यांच्यात मोठ्या संरक्षण करारावर शिक्कामोर्तब झाले. भारत सरकारने शनिवारी (15 जुलै) ही घोषणा केली. या अंतर्गत भारतीय नौदलाला फ्रान्सच्या दसॉ एव्हिएशनकडून 26 नवीन प्रगत राफेल लढाऊ विमाने मिळतील, जी नौदलाच्या गरजेनुसार खास तयार केली जातील. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीत हा करार झाला.  India Seals Purchase of 26 Rafale Jets China and Pakistan tension increased There will be a significant increase in the strength of the Indian Navy

राफेलची निर्माता कंपनी दसॉ एव्हिएशनने याबाबत माहिती दिली की,  “भारतीय नौदलाला नवीनतम पिढीतील लढाऊ विमानांनी सुसज्ज करण्यासाठी भारत सरकारने नौदलाच्या राफेलची निवडीची घोषणा केली. भारतीय नौदलाचे 26 राफेल आधीच सेवेत असलेल्या 36 राफेलमध्ये सामील होतील.” संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी (13 जुलै) फ्रान्सकडून नौदलासाठी २६ राफेल जेट आणि तीन फ्रेंच-डिझाइन स्कॉर्पीन श्रेणीच्या पाणबुड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी दिली.  हा निर्णय भारतात घेण्यात आलेल्या यशस्वी चाचणी मोहिमेनंतर आला आहे, ज्यामध्ये नौदलाच्या राफेलने हे सिद्ध केले आहे की ते भारतीय नौदलाच्या ऑपरेशनल आवश्यकता पूर्ण करते आणि त्यासाठी पूर्णपणे योग्य आहे.

या संरक्षण करारात भारताला 22 सिंगल सीटर राफेल-एम मरीन लढाऊ विमाने मिळणार आहेत. ही लढाऊ विमाने स्वदेशी बनावटीच्या आयएनएस विक्रांत या विमानवाहू नौकेवर तैनात केली जातील. त्याचबरोबर 4 ट्रेनर राफेल मरीन विमाने उपलब्ध होणार आहेत. राफेल-एम ही फ्रान्सच्या राफेल लढाऊ विमानांची नौदल आवृत्ती आहे. संरक्षण करारानंतर भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात लक्षणीय वाढ होणार आहे.

India Seals Purchase of 26 Rafale Jets China and Pakistan tension increased There will be a significant increase in the strength of the Indian Navy

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात