विद्यार्थ्यांना घेऊन जाणा-या रिक्षाला पिकअपची धडक; चालकासह ११ विद्यार्थी जखमी

पुणे : सोलापूर महामार्गावर विद्यार्थ्यांना उरूळी कांचन येथील विद्यालयात सोडण्यासाठी जाणा-या एका रिक्षाला भरधाव पिकअपने पाठीमागून धडक दिल्याने रिक्षामधील जवळपास ११ विद्यार्थी आणि रिक्षाचालक जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. On pune – solapur road school auto crashed pickup Jeep, ११ students injured in accident


विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे – सोलापूर महामार्गावर विद्यार्थ्यांना उरूळी कांचन येथील विद्यालयात सोडण्यासाठी जाणा-या एका रिक्षाला भरधाव पिकअपने पाठीमागून धडक दिल्याने रिक्षामधील जवळपास ११ विद्यार्थी आणि रिक्षाचालक जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. जखमी विद्यार्थ्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. सुदैवाने या अपघातात जीवीतहानी झाली नाही.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात संदिप कोळपे (रा. बोरी भडक, ता. दौंड , जि. पुणे) हा रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे. तर अंकुश येलभारे (वय १३), मानसी चंद्रमोहन कोळपे (वय १५), भक्ती बापुराव शिंदे (१५), वैष्णवी आप्पासाहेब गव्हाणे, तनुजा चंद्रमोहन कोळपे (१०), मयूरी शिंदे (वय १०), अमर शिंदे (वय १२), हर्षल वाघमारे (वय १४ , सर्व रा. बोरीभडक, ता. दौंड, जि. पुणे) असे अपघात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. यातील काही विद्यार्थी हे महात्मा गांधी महाविद्यालयात तर एक विद्यार्थिनी वैष्णवी ढवळे ही स्वामी विवेकानंद विद्यालयातील इयत्ता आठवीत शिकणारी आहे.



शाळा सुरु झाल्यापासून हे विद्यार्थी नेहमीप्रमाणे बोरीभडक येथून रिक्षाने उरुळी कांचन येथील विद्यालयात जात होते. यावेळी उरूळीकांचन जवळ असतांना रिक्षाला पाठीमागून येणा-या भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली. धडक ऐवढी जोरदार होती की रिक्षा रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. यावेळी रिक्षा चालक संदिप कोळपे हा जमीनीवर आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार बसला आहे. तर काही विद्यार्थ्यांना किरकोळ तर काहिंना गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यांच्यावर उरुळी कांचन येथील येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

On pune – solapur road school auto crashed pickup Jeep, ११ students injured in accident

मह‌त्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात