देशात प्राणघातक कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाचा धोका वाढत आहे. काल देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आणखी दोन जणांना ओमायक्रॉन प्रकाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यानंतर या प्रकाराने संक्रमित लोकांची संख्या 23 झाली आहे. ओमायक्रॉनच्या धोक्यादरम्यान चिंताजनक बातमी समोर आली आहे. मागच्या काही दिवसांपासून परदेशातून महाराष्ट्रात आलेले सुमारे 100 प्रवासी बेपत्ता झाले आहेत. प्रशासन आता या लोकांची माहिती गोळा करत आहे. Omicron Over 100 people from abroad gone missing in Maharashtra amid fear of Omicron
वृत्तसंस्था
मुंबई : देशात प्राणघातक कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाचा धोका वाढत आहे. काल देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आणखी दोन जणांना ओमायक्रॉन प्रकाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यानंतर या प्रकाराने संक्रमित लोकांची संख्या 23 झाली आहे. ओमायक्रॉनच्या धोक्यादरम्यान चिंताजनक बातमी समोर आली आहे. मागच्या काही दिवसांपासून परदेशातून महाराष्ट्रात आलेले सुमारे 100 प्रवासी बेपत्ता झाले आहेत. प्रशासन आता या लोकांची माहिती गोळा करत आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) प्रमुख विजय सूर्यवंशी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, परदेशातून ठाणे जिल्ह्यात आलेल्या 295 परदेशी प्रवाशांपैकी 109 प्रवाशांबद्दल काहीही माहिती नाही. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, यातील काहींचे मोबाईल बंद आहेत. एवढेच नाही तर परदेशातून आलेल्या काही प्रवाशांनी जो आपला पत्ता दिला होता, त्याला आता कुलूप आहे.
ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने धोकादायक देशांतून भारतात येणाऱ्या लोकांना सात दिवस होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा नियम बनवला आहे. अशा लोकांची सात दिवसांनी पुन्हा कोरोना चाचणी होते.
सोमवारी मुंबईतील दोन जणांना ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दोघेही 25 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून परतले होते आणि त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना ओमायक्रॉन आहे की नाही हे तपासण्यासाठी एनआयव्ही, पुणे येथे जिनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुने पाठवण्यात आले. आता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ओमायक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या १० झाली आहे. सध्या देशभरात ओमायक्रॉनचे 23 रुग्ण आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App