महाविकास आघाडीत नेते नव्हे, तर “पोपट” बोलतात;त्यांना फेब्रुवारीपर्यंत फक्त टाइमपास करायचाय, ओबीसी आरक्षण द्यायचेच नाहीए; फडणवीसांचा घणाघात

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडीत नेते नव्हे, तर त्यांचे “पोपट” बोलत राहतात. कारण त्यांना ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचेच नाहीए. फेब्रुवारी २०२२ पर्यंत नुसता टाइमपास करायचा आहे. एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झाल्या  की मग आरक्षण देऊनही ओबीसी समाजाला काही फायदा नाही, हे त्यांना माहिती आहे, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. OBC reservation is an important issue. But there are some “parrots” of MVA (Maha Vikas Aghadi) in the current government.

महाराष्ट्र भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणीत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न हा महत्वाचा झालाय. रोज खोटं बोल पण रेटून बोल, अशा प्रकारे महाविकास आघाडीचे बोलके पोपट जास्त बोलतात. नेते कमी बोलतात कारण त्यांना माहिती आहे. आपल्या चुकीमुळे राजकीय आरक्षण गेले आहे. त्यामुळेच त्यांचे बोलके पोपट बोलत आहेत. त्यांचे मालक जसे सांगतात तसे ते बोलत राहतात.”, असं म्हणत ओबीसी आरक्षणावरुन देवेंद्र फडणवीस यांनी टीकेची तोफ महाविकास आघाडी सरकारवर डागली आहे.

फेब्रुवारी २०२२ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आहेत. त्यावेळी भाजप ओबीसी समाजातल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना प्राधान्याने तिकीटे देणार आहे. मग एखादा उमेदवार पडला तरी चालेल पण भाजप आपल्या वचनापासून मागे हटणार नाही, असे आश्वासन त्यांनी पुन्हा एकदा दिले.ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आपले सरकार असताना केस आली. तेव्हा केस काय होती? पाच जिल्ह्यांमध्ये 50 टक्क्यांच्या वरच्या आरक्षणाविरोधातली ही केस होती. 50 टक्क्याच्या आतल्या आरक्षणाची केसच नव्हती. त्या वेळीही आपण 50 टक्क्यांच्या वरचं आरक्षण वाचवण्यासाठी एक अभ्यास केला आणि त्यातून एक अध्यादेश काढला. तो कोर्टाला सादर केला. सुप्रीम कोर्टाने मान्य केला. 50 टक्क्यांच्या वरचे आरक्षणही मान्य करून पुढे जाण्याची मंजुरी दिली.”, याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली.

फडणवीस म्हणाले की, देशाच्या इतिसात पहिल्यांदा एवढे ओबीसी मंत्री बनवणारे कोण असतील? ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. आपण म्हणायचो बहुजनांचे राज्य येणार, ते आज मोदींचे मंत्रिमंडळ पाहिल्यावर कळतंय. ओबीसींचा खरा पक्ष कोणता? तर तो भाजप आहे. ओबीसींना संवैधानिक दर्जा मिळवून देण्याचे काम भाजपने केले आहे. आज केंद्र सरकराच्या माध्यमातून ओबीसी समाजासाठी खूप योजना सुरू झाल्या आहेत. ओबीसी समाजाला स्थान देण्यासाठी महामंडळासाठी निधी दिला. सर्व समाजाला पुढे घेऊन जात नाही तोपर्यंत आपण देशाला पुढे घेऊन जाऊ शकत नाही, हे आमच्या पक्षाचे ब्रीद वाक्य आहे.

OBC reservation is an important issue. But there are some “parrots” of MVA (Maha Vikas Aghadi) in the current government.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात