नाशिक : शिवसेना-भाजप युतीच्या शिंदे फडणवीस सरकारच्या विश्वास दर्शक ठरावाच्या वेळी विधानसभेत अनुपस्थित राहिलेल्या काँग्रेसमधल्या 10 आमदारांना कारणे दाखवायची नोटीस बजावून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली आहे की त्यांना काँग्रेस बाहेर घालवण्याची स्वतःहूनच तरतूद केली आहे?, याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे.Notice of discipline or expulsion of Congress directly ?? : Action taken against 10 MLAs including Ashok Chavan
कारण ज्या आमदारांनी विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केले किंवा जे आमदार काही कारणांनी विश्वास दर्शक ठरावाच्या वेळी गैरहजर राहिले त्यामागे अनेकांचे हेतू लपून राहिलेले नाहीत. अशा स्थितीत शिस्तभंगाची कारवाई करून काँग्रेस स्वतःहूनच आपल्या आमदारांना बाहेर काढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचाही समावेश आहे. याचा अर्थ काँग्रेसमध्ये आधीच संख्यात्मक पातळीवर आमदार घटलेले असताना आणखी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रपती निवडणुकीमध्ये याचे प्रत्यंतर येण्याची दाट शक्यता आहे.
काँग्रेसमधील धुसफुसीच्या अनेक चर्चा रंगलेल्या असतात. या चर्चांची दखल आता काँग्रेस हायकमांडने जरूर घेतली आहे. पण त्यातून काँग्रेस आमदारांना शिस्त लागण्याऐवजी काँग्रेसचे आमदार घटण्याचीच दाट शक्यता आहे. शिंदे – फडणवीस सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाच्या वेळी काँग्रेसचे तब्बल 11 आमदार अनुपस्थित होते. यापैकी 10 आमदारांना पक्षाने नोटीस बजावली आहे. यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही समावेश आहे. या संपूर्ण प्रकारची चौकशी करण्यासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोहन प्रकाश यांची नियुक्ती केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसच्या अनेक आमदारांच्या अनुपस्थितीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केलेली. तसेच त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाईची मागणी केली होती.
– विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग
गेल्या महिन्यात 20 जूनला विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीत काँग्रेसच्या दोन उमेदवारांपैकी एकाचा पराभव झाला. काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांचा विजय झाला. तर चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांची मते फुटल्याची बातमी समोर आली होती. या घटनेप्रकरणी देखील पक्षात खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती.
पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे ही कारवाई मागणी केली होती. एका दलित उमेदरावाचा पराभव ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी. या प्रकरणी चौकशी व्हायला हवी. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अनेक आमदारांची सभागृहात अनुपस्थिती हे देखील योग्य नाही, असंदेखील पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले होते.
…तर काँग्रेसचे दहा आमदारांचा गट फुटणार होता?
विशेष म्हणजे शिवसेनेचे आमदार महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसच्या देखील 10 आमदारांचा गट महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. शिवसेनेच्या आमदारांच्या बंडखोरीचं प्रकरण लवकर निवळले असते तर काँग्रेसमधीलही धुसफूस उफाळून आली असती अशा चर्चा रंगल्या होत्या. पण आता शिंदे फडणवीस सरकार आपला राजकीय पाया मजबूत करत असताना काँग्रेस आमदारांमध्ये फूट घडणारच नाही त्याची शाश्वती कोणालाही देता येत नाही.
– काँग्रेस हायकमांडची ‘या’ आमदारांना नोटीस
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दिकी, आमदार वांद्रे पूर्व, धीरज देशमुख, लातूर ग्रामीण, कुणाल पाटील, धुळे ग्रामीण, राजू आवळे, हातकणंगले, मोहन हंबर्डे, नांदेड दक्षिण शिरीष चौधरी, रावेर, माधवराव पाटील जवळगावकर, हिमायतनगर
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App