पीएम केअर फंडातून आलेले 400 व्हेंटिलेटर्स न वापरणे हे राज्याला शोभा देणारं नाहीये. व्हेंटिलेटर्स खराब असल्याने ते वापरत नसल्याचं राज्य सरकार सांगत आहे. काही व्हेंटिलेटर्स खराब असू शकतील पण त्यासाठी 400 व्हेंटिलेटर्स न वापरणं याला काहीही अर्थ नाहीये. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने हे घृणास्पद राजकारण करू नये, असा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.Not using ventilators from PM Care Fund is hateful politics, Praveen Darekar alleges
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पीएम केअर फंडातून आलेले 400 व्हेंटिलेटर्स न वापरणे हे राज्याला शोभा देणारं नाहीये. व्हेंटिलेटर्स खराब असल्याने ते वापरत नसल्याचं राज्य सरकार सांगत आहे.
काही व्हेंटिलेटर्स खराब असू शकतील पण त्यासाठी 400 व्हेंटिलेटर्स न वापरणं याला काहीही अर्थ नाहीये. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने हे घृणास्पद राजकारण करू नये, असा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
दरेकर म्हणाले, प्रविण दरेकर यांनी म्हटलं, कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता राज्यात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. मुंबईच नाही तर ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे.
औषधांचा तुटवडा भासत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरू आहे. त्यातच राज्य सरकारकडून केंद्रावर सातत्याने टीका होत आहे की, केंद्र सरकार महाराष्टÑाला सापत्नभावाची वागणूक देत आहे.
मात्र, हेच राज्य सरकार सध्याच्या काळात गरजेचे असलेले व्हेंटिलेटर वापरत नाही. यामुळे नागरिकांच्या जीवाशीच राज्य सरकार खेळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App