प्रतिनिधी
मुंबई : राज्यसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या एका दिवसावर आले असताना आता विधान परिषद निवडणुकीत भाजपने सहावा उमेदवार उतरवून चुरस आणली आहे. Not Harshvardhan Patil from BJP, but Sadabhau Khot
पण भाजपचा हा सहावा उमेदवार काल मराठी माध्यमांनी छातीठोकपणे सूत्रांच्या हवाल्याने बातम्या दिल्यानुसार हर्षवर्धन पाटील हे नसून प्रत्यक्षात सदाभाऊ खोत हे आहेत!! म्हणजे भाजपने मराठी माध्यमांची हर्षवर्धन पाटील यांच्या नावाने उडवलेले पतंग पुन्हा एकदा काटले आहेत.
मराठी माध्यमांनी असेच पतंग राज्यसभा निवडणुकीच्या वेळी पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांच्या नावाने उडवले होते. परंतु, भाजपने वेगळ्याच नावांच्या घोषणा करून ते पतंग खाली आणले होते. विधान परिषद निवडणुकीच्या बाबतीतही असेच घडले आहे.
काल रात्री उशिरा मराठी प्रसार माध्यमांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव विधान परिषदेचा उमेदवार म्हणून भाजपने फिक्स केल्याच्या बातम्या पक्षांतर्गत गोटातील सूत्रांच्या हवाल्याने छातीठोकपणे दिल्या होत्या. पण प्रत्यक्षात माध्यमांच्या या बातम्या खोट्या ठरल्या आणि सहावा उमेदवार सदाभाऊ खोत यांच्या रूपाने भाजपने विधान परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरवला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App