वृत्तसेवा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. तो रद्द करून जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन प्रशासनाने केले आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी कडक लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला. आज सकाळी 11 वाजल्यापासून नवे निर्बंध लागू होणार होते. मात्र, जनता कर्फ्यूचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. Not a strict lockdown in Kolhapur, now only a public curfew
कोल्हापूर जिल्ह्यात 5 मे पासून दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी याबाबत बैठक घेतली होती. या बैठकीत तो निर्णय घेतला होता. त्यानुसार 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन असणार होता. परंतु आता अवघ्या काही तासांत निर्णय बादलला असून लॉकडाऊन ऐवजी जनता कर्फ्यु लागू केला.
नियमावली
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी 5 मे 2021 रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून 13 मे 2021 सकाळी सात वाजेपर्यंत जनता कर्फ्यू उत्स्फूर्तपणे पाळावा,असे आवाहन प्रशासनाने केलं आहे.
1. नागरिकांनी अत्यावश्यक सेवा, तातडीची वैद्यकीय गरज याशिवाय घराबाहेर पडू नये
2. वैध कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नये
3. वैद्यकीय सुविधा व सेवा पूर्ण वेळ सुरु ठेवावा
4. अत्यावश्यक सेवा, किराणा दुकाने, बेकरी इ. दुकाने सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत उघडी राहतील. परंतु सामान घरपोच मागवावे. अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडावे.
5. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स यांनी फक्त घरपोच सेवा द्यावी.
6. अत्यावश्यक, निर्यात व निरंतर प्रक्रिया उद्योग आस्थापना यापूर्वी दिलेल्या नियंत्रणास बांधील
7. शेती व शेतीशी निगडीत त्याचप्रमाणे मान्सूनपूर्व सर्व कामे सुरु ठेवावीत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App